प्रा.विश्वनाथ कराड यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९४१ रोजी झाला.
मुळचे लातूरचे इंजिनीअर शिक्षण असलेले डॉ.विश्वनाथ कराड हे पुण्यातील ख्यातनाम सरकारी इंजिनियरिंग कॉलेज सीओईपी कॉलेजमध्ये एक लोकप्रिय प्रोफेसर होते. पुढे त्यांनी डॉक्टरेटही मिळवली. या दरम्यानच्या काळातील अनुभवावरून स्वतःची एक आदर्श शैक्षणिक संस्था काढण्याचा विचार त्यांच्या मनात आला. स्वामी विवेकानंद आणि संत परंपरेतून पुढे आलेले विचार विद्यार्थ्यांमध्ये पोहोचविण्यासाठी त्यांनी एमआयटी ही संस्था सुरू केली. ही त्यांची संस्था पुण्यात खासगी शिक्षण उपलब्ध करुन देत असून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम त्यांनी केले आहे.
त्यांनी केलेले कार्य समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाचे आहे. ‘पुणे शहराला एज्युकेशन, आयटी हब अशी ओळख देण्यात एमआयटीचा महत्त्वाचा वाटा आहे. पुण्यात एम आय टी मार्फत सर्व क्षेत्रांचे शिक्षण देणार्याए संस्था प्रा. कराड यांनी सुरु केल्या.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply