नवीन लेखन...

पुणेरी प्रपोज

Proposed by A True Punekar

एक सदाशीवपेठी चिरंजीव (कधी नाही ते) प्रेमात पडले, आणि प्रेयसीला खालील प्रमाणे पत्र लिहिले.

त्यांच्या प्रेमाचा काय निकाल लागला ते पत्र वाचल्यावर लक्षात येईलच!

प्रिय xxxxxx,
तू मला खूप आवडतेस.

मला तुझ्याशिवाय चैन पडत नाही. तु माझी होशील कां?

(हो म्हणण्यापूर्वी खालील अटी मान्य कराव्या)

१) दूपारी १ ते ४ फोन करु नये.

२) परफ्यूम, लिपस्टीक, ड्रेस, साड्या माझ्याकडे मागू नये, आपल्या तीर्थरुपांकडून आणणे.

३) हाॅटेलमधे गेल्यास निम्मे बील भरावे.

४) महिन्यात फक्त एक सिनेमा दाखवला जाईल.

५) बाईकवर बसताना मला मिठी मारु नये, रस्त्यावर श्रुंगारीक चाळे करणे मला पसंत नाही.

६) पर्वतीवर फिरायला जाण्यासाठी वेळेवर यावे, ऊशीर करु नये.तू रिकामी असलीस तरी मला नोकरी आहे.

७) भेळ, पाणी पूरी, आईस्क्रीम जास्त खाऊ नये, माझ्या पगाराचा आकडा लक्षात ठेवावा.

८) भांडण झाल्यास फक्त एकदा समजूत काढण्यात येईल, नंतर अपमान होईल.

९) मी सतत तुझीच तारीफ करावी अशी अपेक्षा ठेवू नये, मला स्वतःची तारीफ करण्यास वेळ द्यावा.
आणि सगळ्यात महत्वाच

१०) माझे प्रेम मान्य नसल्यास मी दिलेलं गुलाब पुष्प परत करावे, त्याची नासधूस करु नये. मी त्याचा अन्यत्र वापर करीन.

ती सुद्धा सदाशिव पेठेतलीच, यावर तिने उत्तर दिले.

प्रिय xxxxx,
लिहीण्याची पद्धत म्हणून प्रिय लिहीले आहे.

इतक्यात गैर अर्थ काढू नये.

पहिली गोष्ट, तू पाठवलेल्या पत्रावर पुरेसे तिकीट लावलेले नव्हते.

लिफाफ्यावर तुझे नाव नसल्याने मी दंड भरून पत्र घेतले.

आधी कल्पना असती तर परत पाठवले असते. पुन्हा असा हलगर्जी पणा सहन केला जाणार नाही. यावेळी भरलेला दंड भेटू तेव्हा परत करावा.

१) १-४ मी झोपलेली असते. तेव्हा फोन करीन अशी अपेक्षा करणे हा माझा अपमान आहे.

२) टॉक टाईम दिल्यासच मी फोन करीन. अन्यथा फोन मी करणार नाही.

३) घरचे सोडून हॉटेलात जाण्याची हौस मला नाही. तू घेऊन गेल्यास मी बिल भरण्याचा प्रश्न येत नाही. ते तुलाच भरावे लागेल.

४) मला सिनेमा पहायचा असल्यास मी कोणाही बरोबर जाऊन पाहीन. मी तुझ्याच बरोबर जावे असा हट्ट असल्यास मध्यंतरात चहा आणि वड्यासह सर्व खर्च करावा लागेल .

५) जर बाईकवर मिठी तुला चालणार नसेल तर इतर कोणामागे बसण्याचा हक्क मी राखून ठेवीत आहे.

६) मी परवतीला फिरायला माझ्या वेळेवर जाते. तू थांबबणार नसशील तर जो थांबेल त्याच्या बरोबर जाईन.
मग रुसनं फूगनं चालणार नाही.

विषय संपला

Avatar
About Guest Author 524 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..