नवीन लेखन...

समृद्ध शेती, श्रीमंत शेतकरी काल, आज आणि उद्या

शेती आणि शेतकरी देशातील सर्वात महत्त्वाचा घटक जो आपणास कधीही उपाशी ठेवत नाही मित्रहो आज आपण भारतीय शेतीचा इतिहास सुरुवात नवनिर्मिती तंत्रज्ञान प्रगती संशोधन उद्योग व्यवसाय निर्यात पर्यटन आणि बरेच काही  या लेखातून आपण चर्चा करूया.

शेपूर्ण जगात शेतीचा शोध दहा हजार वर्षांपूर्वी सर्वात प्रथम मध्यपूर्वेत म्हणजे आजचे इजराइल, पॅलेस्टाईन, जॉर्डन, तुर्कस्तान, कुवेत आणि इराक या देशांमध्ये त्यांच्या जवळपासच्या सुपीक प्रदेशात लागला. या ठिकाणी प्रत्यक्ष शेतीला सुरुवात करण्याअगोदर मनुष्य आणि स्त्रिया जंगलात जाऊन वनस्पतींचे निरीक्षण करून खाद्य योग्य अन्नाची बियाणे राखून ठेवत असत. ती पुन्हा पेरता येतात आणि त्यातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळते हे मनुष्य प्राण्यांच्या लक्षात आले आणि यावरून तो बियाणे गोळा करू लागला लागवड कापणी मळणी करून तो जास्त अन्नधान्य मिळवू लागला, परंतु सुरुवातीच्या काळात मनुष्य आपल्या हाताने शेतीची मशागत पेरणी इतर कामे करत होता. त्याच्या पुढील काही काळात प्राण्यांचा वापर शेतीसाठी सुरू झाला.

फार वर्षांपूर्वी शेतीच्या प्रारंभिक स्थितीत गवतांच्या काही जातींमधून गव्हाचे एमर व आईन कॉन हे दोन पीक प्रकार असे धान्य निर्माण झाले आणि मसुरी सारख्या डाळी शोधण्यात आल्या तसेच जवस आणि वाटाणे यांचाही पुढे शोध लागला. आणि याच प्रदेशात शेळ्या आणि मेंढ्या याचा देखील शोध लागल्यानंतर दुग्धजन्य पदार्थ मिळवण्यास सुरुवात झाली. या प्रदेशातून शेतीचा प्रसार उत्तर आफ्रिकेतील इजिप्त भूमध्य सागरी देश आणि आशिया खंडातील देशांतून युरोपमध्ये झाला. मध्यपूर्वेतील शेती शोधानंतर भारतात ही शेती पद्धती तीन हजार पाचशे वर्षांनंतर पोहोचली म्हणजे भारतीय शेतीचा देखील साडेसहा हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे असे म्हणायला हरकत नाही. रशियन वनस्पती शास्त्रज्ञ कॉफी लोन यांनी जगातील आठ पिकांची उगमस्थाने सांगितले आहेत त्यामध्ये भारत-म्यानमार हा प्रदेश देखील आहेत. 117 वनस्पतीची नोंद झाली आहे त्यामध्ये तांदूळ तूर, मूग, उडीद, चणे, चवळी, तृणधान्य, कडधान्य, वांगे, मुळा, काकडी, भाज्या, आंबा, चिंच, लिंबू, फळवर्गीय पिके याशिवाय ऊस, कापूस, तीळ, करडई, ताग, काळीमिरी, दालचिनी, तीळ यासारखी विविध प्रकारची महत्त्वाची पिके आहेत.

भारतातील पुरातन शेतीचे स्वरूप

भारतीय शेतीत स्थानिक परिस्थितीशी सुसंगत काटक बियाणांचा वापर केल्याने माती आणि शेतीतील जैवविविधता टिकून राहिली. अर्थातच त्याने भारतीय शेती टिकून राहिली शेतीची शाश्वतता टिकवण्यासाठी पाणी, माती, जंगले यांचे संवर्धन महत्त्वाचे ठरले. म्हणून प्रत्येक गावात गावतळे सापडते आणि त्याचे पाणी शेतीसाठी तसेच त्यातील गाळ काढून शेतीची सुपीकता वाढवली जात असे. त्यामुळे स्वच्छ हवा झाडे पाणी आरोग्यदायी वातावरण निर्माण होत असेल.

इंग्रजांच्या काळातील भारतीय शेती

इंग्रज आपल्या देशात येण्यापूर्वी भारतातील ग्रामीण प्रदेश शेती व्यवस्थापनाबाबत स्वायत्त होता. शेतीत काय कसे कोणते कोणी पिकवायचे, उत्पादनाचा वापर विनियोग हे शेतकरी स्वतः ठरवत असे. तेव्हा शेतकरी स्वायत्त होते. इंग्रजी राजवटीमध्ये मात्र स्वायत्ततेवर बंधने घालण्यात आली. ग्रामस्थांच्या जंगलाचा अधिकार हिरावून घेण्यात आला. जमिनीवरील शेतसारा जो पाच टक्के होता तो 50 टक्के पर्यंत वाढवला. पीक येवो अथवा न येवो परंतु शेतसारा देणे अनिवार्य केले. इंग्रजांनी अन्नधान्याच्या पिकांना पसंती देण्याच्या ऐवजी कापूस, निळ, ऊस, भुईमूग अशा नगदी पिकांवर भर देण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात हाल झाले. इंग्रजांच्या या चुकीच्या धोरणामुळे जमीनदार आणि सावकार यांचा नवा वर्ग निर्माण झाला आणि शेतकऱ्यांच्या लुटीला सुरुवात झाली. शेतकरी कर्जबाजारी होऊ लागला. कर्जफेड वेळेवर न झाल्यामुळे शेती सावकाराच्या घशात जाऊ लागल्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या गरिबीत प्रचंड वाढ झाली या सर्व बाबींमुळे देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या काळापर्यंत शेतीची दुरवस्था झाली. सरकारच्या धान्य चुकीच्या वितरणामुळे लाखो लोक मृत्यू पावले.

स्वातंत्र्याच्या नंतरचा हरित क्रांतीचा काळ

भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर 1950- 51 पासून भारतीय नियोजन मंडळाच्या नियोजनानुसार पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून विकास प्रक्रिया सुरू झाली. कृषी क्षेत्रावर औद्योगिक क्षेत्रांचा विकास घडवून आणण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, राजीव गांधी, डॉक्टर मनमोहन सिंग आणि आता नरेंद्र मोदी अशा अनेक थोर नेत्यांनी देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. स्वातंत्र्यानंतर कारखानदारी वाढली. कृषी उद्योगात रासायनिक खतांचे प्रमाण  वाढले. उद्योग, बंधारे, कॅनॉल, धरणे बांधणे इत्यादी प्रकारे कृषी उत्पादन वाढवण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे भारतात हरित क्रांती 1966 ते 1969 या काळात घडून आली.

कोकणातील शेती आणि शेतकरी

महाराष्ट्रातील कोकण वैभव संपन्न निसर्गाचे औदर्य आणि माणुसकीचे सौंदर्य म्हणजे कोकण. पालघर, ठाणे ते सिंधुदुर्ग, सावंतवाडी अगदी गोवा हद्दीपर्यंत. मुंबईचा समावेश कोकण विभागामध्ये आहे कोकणात शेती क्षेत्रातील विकासासाठी पुढील उपाययोजना करता येतील ः

नैसर्गिक शेती – बासमती तांदूळ, वाडा कोलम, ब्राऊन तांदूळ, काळा तांदूळ, रासायनिक खतमुक्त उत्पादन यांना संपूर्ण भारतभर मोठ्या प्रमाणात मागणी आहे ते देखील उत्पादन आपल्याला कोकणात करता येऊ शकेल,

भाजीपाला – कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पादन शक्य. कोथिंबीर, मेथी, पालक, मुळा उत्पादन शक्य.

फळभाजी – वांगी, कारले, तोंडले, काकडी, टोमॅटो, पडवळ शिराळे, दुधी हे उत्पादन शेतीत थोड्याशा पाण्याच्या सुविधा घेतही करता येऊ शकते आणि अन्य उत्पादने म्हणजे सुरण, अळू, बटाटे, रताळे, कोणफळ, कनगर.

फुल उत्पादन – झेंडू, शेवंती, गुलाब, गुलछडी, तुळशी, चाफा इत्यादी उत्पादन अगदी सहज घेता येते हे सर्व उत्पादन मुंबई बाजारात दररोज विक्री करता येते आणि नगद पैसा मिळवता येतो.

फळ उत्पादन  – आंबा, नारळ, चिकू, फणस, काजू, सुपारी यांचे नैसर्गिक आणि आधुनिक पद्धतीने उत्पादन घेता येते.

दुधउत्पादन – कपिला गाय, गीर गाय, जर्सी, न्यू जर्सी, म्हैस, बकरी यांच्या दुधाचे उत्पादन घेता येते. आपल्या कोकणात पाऊस भरपूर असल्यामुळे नैसर्गिक चारा उत्पादन भरपूर आहे. जुलै ते फेब्रुवारीपर्यंत सहजरित्या चारा उपलब्ध आहेत त्यामुळे दूध उत्पादन आणि दुधापासूनचे उत्पादन मिळवता येते. हे उत्पादन मुंबई बाजारात विक्री करता येते.

बकरी पालन – घरात अंगणात परसदारांमध्ये पाच दहा बकऱ्या सहज पाळता येतात आणि त्या संपूर्ण कुटुंबाचे अर्थशास्त्र सांभाळतात आणि चांगले उत्पन्न मिळवून देतात. त्यासाठी कोकण कन्या आणि उस्मानाबादी शेळ्यांच्या जाती उत्तम आहेत.

कोंबडी पालन – देशी कोंबड्या आर आर कोंबडी यासारख्या अंडी आणि मास उत्पादनासाठी उत्तम. फक्त 200 ते 300 कोंबड्या पानातून दररोज 70 ते 80 देशी अंडी मिळतात या अंड्याची किंमत चांगली आहे. खाद्य कमी लागते नफा चांगला मिळतो. ज्यांना शेतीत काम करायचे नाही परंतु उत्पन्न कमवायचे आहे त्यांना असे उत्पादन घेता येते. शेतात जाऊन शेवग्याच्या शेंगा, कडीपत्ता, आले, हळद, केळी, पपई, तुळशी, अळू या कायमस्वरूपी उत्पन्न मिळवून देतात.

कोकणातील कारखानदारी

ग्रीन टी, दंतमंजन, अर्जुन साल पावडर, बेलांच्या पानाची पावडर, शेवग्याच्या पानांची पावडर, कडीपत्ता पावडर, रताळ्याची वेफर्स, मसाले काजूगर, फणस पावडर, सुपारी पासून मुखशुद्धी, हळद पावडर, राजगिरा उत्पादन, शेंगदाणा प्रक्रिया उद्योग, खाद्य उत्पादन, कडधान्य, उत्पादन, आणि प्रक्रिया उद्योग बांबू उद्योग बांबू प्रक्रिया उद्योग बायो सीएनजी बायोडिझेल इथेनॉल फर्निचर उत्पादन कृषी पर्यटन, मत्स्य उत्पादन, मत्स्य प्रक्रिया, उद्योग फळ प्रक्रिया उद्योग, भाजीपाला प्रक्रिया उद्योग, फळे भाजीपाला निर्यात, कृषी अवजारे उद्योग, कृषी प्रशिक्षण व्यवसाय, आणि अनेक अशा प्रकारचे उद्योग जे आपणास सहज आणि कमीत कमी भांडवलात आपल्याला करता येतात. जे कोकणात चालू शकतात. ज्या आपल्या बांधवांना आर्थिक अडचणीमुळे उद्योग करता येणार नाहीत त्यांनी जिल्हा उद्योग केंद्र, नाबार्ड, राष्ट्रीय बँका, पंतप्रधान रोजगार, उद्योग विभाग लघुउद्योग, उद्योग यांच्याकडून सवलतीच्या दराने कर्ज मिळते तसेच सबसिडी देखील मिळते.

बस आपल्या मनाची तयारी पाहिजे उद्योग कोणताही करता येऊ शकेल, मुंबई सारखी जागतिक बाजारपेठ आपल्या हाकेच्या अंतरावर आहे. कोणतेही उत्पादन मुंबईत सहज विकता येते. मग काय? करूया ना आपण देखील कारखाना सुरुवात. शुभस्य शीघ्रम् आता चाकरमाने नाही तर कारखानदार, उद्योगपती, बांबू सम्राट, नैसर्गिक शेती, निर्यातदार आणि चहा उत्पादक, डेरी संस्थापक आणि भरपूर काही.. आपण चार पावले पुढे टाकली तर या आम्ही दहा पावले आपल्याकडे येऊ आणि सर्वतोपरी आपणास सहकार्य करू विना सहकार नाही उद्धार!

डॉ. हनुमंतराव जगताप

(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..