खिळे, कुंपणाच्या तारा, विजेचे खांब या सर्व नवीन वस्तू असताना चकाकतात, पण त्या कालांतराने निस्तेज होतात आणि त्यांवर एक लाल रंगाचा थर चढतो. हा थर म्हणजे लोखंडाचे ऑक्साईड असते. शुद्ध लोखंडाची हवेतल्या ऑक्सिजनशी प्रक्रिया होऊन त्याचे ऑक्साईडमध्ये रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला गंजणे असे म्हणतात.
लोखंड गंजण्याकरिता हवेतल्या ऑक्सिजनबरोबर पाण्याचीही आवश्यकता असते. पावसाच्या पाण्यामध्ये ऑक्सिजनही विरघळलेला असल्याने दोन्ही गरजा पूर्ण होतात आणि पावसाळयात गंजण्याचे प्रमाण वाढते. गंजाचे पापुद्रे सुटत असल्यामुळे त्या खालचा शुद्ध लोखंडाचा पृष्ठभाग पुन्हा हवेत आणि पाण्यात उघडा पडतो व गंजण्याची प्रक्रिया सुरू राहते.
गंजण्यापासून लोखंडाचे संरक्षण करण्यासाठी लोखंडाच्या पृष्ठभागाचा हवेशी आणि पाण्याशी संपर्क येणार नाही, अशी व्यवस्था करणे गरजेचे असते. हे बऱ्याच पद्धतीने करता येते. सर्वात सोपी पद्धत म्हणजे लोखंडी वस्तूला रंग देणे. रंगामुळे विशेषत तैलरंगामुळे,? हवा आणि पाणी हे दोन्ही लोखंडापर्यंत पोहोचू शकत नाहीत. ज्या वस्तूंना रंग देणे शक्य नसते, अशा वस्तूंना ग्रीज किंवा तेलाचा थर लावून त्या साठवल्या जातात. पण त्यामुळे प्रत्येक वेळी त्या वस्तूंचा वापर करताना बऱ्याच पद्धतीने करता येते. सर्वात सोपी पद्धत म्हणजे लोखंडी वस्तूला रंग देणे. रंगामुळे विशेषत तैलरंगामुळे,? हवा आणि पाणी हे दोन्ही लोखंडापर्यंत पोहोचू शकत नाहीत. ज्या वस्तूंना रंग देणे शक्य नसते, अशा वस्तूंना ग्रीज किंवा तेलाचा थर लावून त्या साठवल्या जातात. पण त्यामुळे प्रत्येक वेळी त्या वस्तूंचा वापर करताना स्वच्छ करून घ्याव्या लागतात.
हे उपाय अन्नपदार्थ शिजवायची किंवा साठा करून ठेवायची वेळ आली की कुचकामी ठरतात. रंग किंवा तेल उष्णतेपुढे टिकत नाहीत, अशा वेळी लोखंडी किंवा पितळी भांड्यांना कल्हई केली जाते. कल्हई म्हणजे लोखंड-पितळाच्या पृष्ठभागावर कथिलाचा पातळसा तर दिला जातो. अशाच प्रकारे लोखंडी पत्रे किंवा कुंपणांच्या तारांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना गॅल्व्हनाइज केले जाते. या प्रक्रियेत तारा किंवा पत्रे वितळलेल्या जस्तामध्ये बुडविले जातात. जस्ताचा एक पातळ थर लोखंडावर चिकटतो आणि गंजण्यापासून रक्षण करतो. काही कालानंतर रंग, कथील किंवा जस्ताचा थर निघून जातो आणि गंजणे पुन्हा सुरू होते. त्यामुळे हे सगळे तात्पुरते उपाय होत. कायमचे संरक्षण मिळवण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा उपयोग करावा लागतो.
Leave a Reply