प्रथिने: प्रोटीन्स ही एक अत्यंत अत्यावश्यक गोष्ट आहे. प्रथम प्रोटीन्स हा शोध फक्त डॉ. विल्यम कमिंग रोज व अल्फ्रेड हॉपकिन्स यांनी १९व्या शतकात लावला. प्रथिने नीट चावल्याने आपल्या अन्नातील पदार्थांचे रूधिराभिसरणाने आपल्या नसांमधून शरीरात जाते व तेच अन्न आपल्या हाडात त्याने मिसळते. तसेच शरीरातील स्नायू बळकट होण्यास प्रथिने जबाबदार असतात. अशा प्रकारे प्रथिने दोन प्रकारची असतात एक म्हणजे आपल्या हाडाला स्नायू चिकटून जातात. तर काही सुटीही असतात. हा प्रथिनाचे शोध घेताना डॉ. रोज यांनी सांगितले की, ही प्रथिने आपल्या मायक्रोस्कोपच्या साहाय्याने एक साखळीसारखे गुंफत असतात. यालाच पेपटाईड लिंकेज असे म्हणतात. डॉ. रोज याने अशा अनेक प्रकारची पेपटाईड लिकेज बरोबर त्यांचे पृथ्थकरण केले व ह्यांना विशिष्ट प्रकारची नावे ठेवली व त्याला नाव ठेवले अमायनो अॅसिड. ही अमायनो असिड महत्त्वाची असतात. अशा प्रकारची अमायनो ॲसिड बाहेरूनच घेतली पाहिजेत. डॉ. रोज यांनी दोन भाग पाडले. जे अमायनो ॲसिड बाहेरून घेतलेच पाहिजे त्यास त्यांनी नाव ठेवले इसेंशियल अमायनो अॅसिड बाकीची अमायनो ॲसिड असतात ती आपल्या शरीरातून तयार होतात. अशा प्रथिनांना त्याने नाव दिले नॉन इसेंशियल अमायनो जसिड. डॉ. रोज याने अशा प्रकारे एकूण १० अमायनो ॲसिड तयार केले. तसेच बाकीचे २२ अमायनो ॲसिड तयार केले.
एके दिवशी एक प्रसंग निर्माण झाला. बाळंत स्त्री हॉस्पिटलमधून घरी जाताना एक मल्टीव्हिटॅमिन ड्रॉप्स डॉक्टर लिहून देत असत. पण काही लोकांना हे ड्रॉप्स दिल्याने काहीच फायदे होत नाही. ही तक्रार डॉक्टरांनी दिल्याने डब्ल्यू.एच.ओ. यांनी डॉ. रोजकडे तक्रार नेऊन दिली. डॉ. रोज यांना खूप आनंद झाला. डॉक्टर रोज यांचेकडे एक ‘अॅनिमल हाऊस’ नावाची प्रयोगशाळा होती. डॉ. रोज याने एक अलबिनो रॅट (पांढरा उंदीर) तयार केला तसेच आणखीन एक काळसर उंदीर तयार केला. पांढऱ्या उंदीराला रोज एक लिटर साधे निरसे दूध दिले व तो पीत असे. फक्त काळसर उंदीराला मात्र दूध देताना त्याचे क्रिम अथवा लोणी काढून देत असे. याला टोण्ड मिल्क असे म्हणत असत. आठ दहा दिवसांनी एक उंदीर कलमडायला लागला. डॉ. रोज यांना खूप आनंद झाला त्यांनी आपल्या दहा इसेंशियल अमायनो ॲसिड काढून त्यात लाइसीन नावाचे १० मिली ॲसिड पाजण्यास सुरुवात केली. आठ दहा दिवसानंतर तोच उंदीर बरोबर चालू लागला. म्हणजे याला मिलव्हाईट ड्रॉप्स यांना देणे आवश्यक आहे. डब्ल्यू.एच.ओ. यांनी सर्वाना तसं कळविले व पुढील संशोधनात लायसीन प्रोटीन व आर्जिनीन यापैकी कोणतेही असे ड्रॉप्स दिले तर चालतात, असे कळवले.
व्हिटॅमिन: सर्व जीवनसत्त्वे आपल्या शरीरात तयार करतातच असे नाही. या जीवनसत्त्वाला अत्यावश्यक खाणे आवश्यक असते. जीवनसत्त्वामुळे शरीराला वाढ होणे त्याचप्रमाणे त्याचे जीवनमान उंचावणे तसेच आरोग्य सांभाळणे यालाच जीवनसत्त्व असे म्हणतात. १९व्या शतकात अशा प्रकारचा जीवनसत्त्वाचा शोध सुरू झाला. असा पहिला शोध डॉ. ख्रिश्चन एजीकमन यांनी लावला डॉ. एजिकमन यांचा जन्म नेदरलँड येथे झाला.
वयाच्या १८ व्या वर्षी यांनी एम. डी. ही पदवी मिळविली. त्यावेळी त्यांची बदली इंडोनेशिया येथे झाली. इंडोनेशियातील अनेक पक्षी विशेषतः कोंबड्यांना रोग जडला. त्या थोडे हळूहळू चालत वर नंतर त्यांची मान एकदम मोडते व मरून जात. डॉक्टरांनी त्यांचे शवविच्छेदन केले. त्यात त्यांना असे आढळले की, एक नस ह्रदयात जाऊन थेट मेंदूपर्यंत पोहोचते. अदिवासी लोक या रोग्याला बेरीबेरी असे म्हणत असत. डॉक्टरांनी खूप विचार केला. पण उपाय सापडेना असे करताच खेडेगावतही हा रोग पसरून या रोगाने पेशंटची जीभ काळी दिसते. तसेच दांत पण काळे दिसतात. हातपायाला सूज येते. चालवत नाही आणि एकदम उदास वाटे. ज्या ज्या वेळी रोग होतो त्यावेळी आदिवासींनी सांगितले की, आम्ही चार हातसडी तांदळाचे दाणे टाकल्यावर बरे वाटते. पण ते तात्पुरते. शेवटी हा प्रकार मेडिकल कँप येथे रोग्यांनाही होऊ लागला. सर्व रोग सैन्यातले होते.
शेवटी एजिकमन यांनी सर्व रोग्यांना हातसडी तांदूळ देण्यास सुरुवात केली. कारण सैन्यातील लोकांना पॉलिश केलेले धान्य मिळत असे. रोग्यांना थोडे बरे वाटे. पण सर्व सैनिक कातावले. शेवटी डॉक्टरने समजूत घातली. सरतेशेवटी हातसडी तांदळाने थोडा फार गुण येतो हे खरे असले पण तो उपाय नव्हता. सरतेशेवटी डॉक्टर एजिकमन यांनी हातसडी तांदूळाचे सूप (तांदळाच्या दाण्यात बाहेर आलेले) गोळा केले ते एका तपेल्यात टाकून ते पाण्याबरोबर उकळविले. ते थंड देण्यास डॉक्टर परत सूप काढून हे पाणी प्यावयास दिले. परंतु त्यास लागलीच बरे वाटू लागले. तरी पण हा काही कायमचा उपाय नव्हता. पाणी बराच वेळ खाली गेल्यावर ते सर्व पाणी बाहेर काढले व त्यांना एक पांढरा पदार्थ दिसला. डॉ. एजिकमन यांनी ते गोळा केले व वाळवून त्याचे इंजेक्शन रोग्यांना दिले व रोगी पूर्णपणे बरे झाले. शेवटी डॉ. एजिकमन याने आपल्या या पाण्यात प्रयोगशाळेत जाऊन खूप प्रयत्न केले व ते यशस्वी ठरले. यांनी डॉक्टर एजिकमन याने त्याचे नाव ठेवले व्हिटॅमिन बी म्हणजे जीवनसत्त्व व्हिटॅमिन हे साऱ्या जगात पहिल्या प्रथम तयार केले. हा शोध साधारण १९२९ साली प्रसिद्ध झाला व डॉ. एजिकमन याला नोबेल पारितोषिक मिळाले व त्यांचा सर्व जगभर सन्मान केला. व्हिटॅमिन बी-१ पुढे जीवनसत्त्व तयार झाल्याने व्हिटॅमिन बी-१ व बी-२, बी – ३वगैरे तयार होऊ लागले.
व्हिटॅमिन-३ (बिटा कॅरोटीन): डॉ. आल्फ्रेड सोमेर हे नेत्रविशारद होते. दक्षिण आफ्रिकेत एक आदिवासी जमात राहात असे. या आदिवासी लोकांना शेती व्यवस्थित येत नव्हती. एखाद्या माणसाला जर नीट दिसत नसेल तर हे लोक गाजर खात व थोड्या दिवसांनी तरुण माणसाला थोडे बरे वाटत असे. परंतु एक गोष्ट अस्तित्वात आली. एखाद्या स्त्रीला जर बाळंतपणांच्या प्रसूतीपूर्व दिवशी डोळ्यांनी दिसत नसे अथवा अशा मुलांना अजिबात दिसत नाही. ही गोष्ट सोमेर यांनी बघितली. त्यांनी खूप विचार केला पण काही मार्ग सापडेना. डॉक्टर सोमेर स्वत: दक्षिण आफ्रिकेमध्ये जाऊन आले व त्यांनी निरीक्षण केले. साऊथ आफ्रिकेमध्ये यांच्याशी चौकशी करून विचारपूस केली. त्यांना हे समजले तर अनेक आदिवासी लोक थोडे दिसत नसेल तर ते गाजर खात असत. डॉक्टर सोमेर यांनी थोडे गाजर खाल्ले व आपल्या मायक्रोस्कोपमधून निरीक्षण केले. डॉ. सोमरने यांनी काही लोकांना व्यवस्थित गाजराचे डोस द्यास सुरुवात केली. व त्याचा त्यांना चांगला परिणाम दिसू लागला. आता डॉक्टर सोमेर यांना गाजरावर व्यवस्थित संशोधन सुरू केले. त्यांना एक पदार्थ दिसला त्याचे नाव बिटा कॅरोटीन. डॉ. सोमेरने परत बिटा केरोटीनवर काम सुरू केले. त्यांनी हेच ते औषध असे पक्के केले. डॉ. सोमेरने परत दुसरे प्रकारचे केरोटीन सापडले व त्याचे नाव अल्फा कॅरोटीन. परत पुढील संशोधनात डॉक्टर सोमेर यांना औषध सापडले. हे व्हिटॅमिनच असले पाहिजे असे ठामपणे सांगितले. त्याचवेळी डॉ. ख्रिश्चन एजिकमन याने आपले व्हिटॅमिन बी-१ असे नाव ठेवले. याला डॉ. सोमेरने नाव दिले व्हिटॅमिन ए. आता औषधांचा ओघ सुरू झाला. ज्या मुलांना, गर्भवती स्त्रीला अथवा कोणत्याही माणसाला कमी दिसत असेल तर त्याने व्हिटॅमिन ए घ्यावे, असे ठरले. परंतु त्याच वेळी मोठी बालके अथवा मुले शक्य असेल तर त्यास जरा मोठा डोस याला मासीव्ह डोस असे दिल्याने रातांधळेपणा लवकरच नाहीसा होतो.
अशा प्रकारे जर लहान मुलांना त्रास होत असेल तर त्याने अर्धा किलो गाजराचा रस घेऊन त्यात लिंब अथवा संत्र्याचा रस ४० सी. सी. एवढे घ्यावा त्याने दहा बारा दिवस घेतल्यास निश्चित बरे वाटते. तसेच त्रास होत असेल आपल्या परिचित डॉक्टरांना डोळे दाखवणे आवश्यक आहे.
व्हिटॅमिन बी-१: डॉ. ख्रिश्चन एजिकमन यांनी व्हिटॅमिन बी-१ चा शोध लावला आता या जीवनसत्त्वामुळे चालना मिळाली. त्याच वेळी थायामिन या संशोधकाचा शोध लावला.
या द्रव्याला नाव ठेविले व्हिटॅमिन बी-१ या थायामिन अभावी लोकांच्या मज्जातंतूपासून एक प्रकारची उदासीनता दिसून येते. तसेच त्याने रक्ताचे रुधाराभिसरण चांगले होते.
तसेच पचनशक्ती वाढते. स्नायूही बळकट होतात. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर तजेलदारपणा येतो. तसेच मानसिक तणाव चांगल्या प्रकारे वाढतो. तसेच मेंदू तरतरीत होतो तसेच संबंध अंगात रुधिराभिसरणही चांगले होते.
व्हिटॅमिन कमतरता कमी झाल्यास मनुष्यप्राण्यास भूक अजिबात लागत नाही.
अशक्तपणा येतो व हातपाय दुखू लागतात. झोप अजिबात लागत नाही. तसेच वजन कमी कमी होत जाते, वगैरे विकार होतात.
व्हिटॅमिन बी-२: (रायबोफ्लेविन) हे अतिशय महत्त्वाचे जीवनसत्त्व असते. यामुळे रक्ताचा पुरवठा वाढतो तसेच बालकाची उंची वाढते. डोळ्यांची वाढ चांगली होते.
व्हिटॅमिन बी – २ची कमतरता झाल्यास डोळ्यांची आग होते तसेच अंगाला खाज येणे अंगावर चिरा पडतात, डोळे लाल होतात व जीभ काहीशी काळसर होते वगैरे.
व्हिटॅमिन बी-६: मधील कमतरता सर्वात महत्त्वाचे म्हणजे झोप न येणे. मानसिकता उदासवाणे उगीचच वाटते. तसेच अंगाला कंप सुटणे. तसेच भूक न लागणे अथवा सांधे दुखणे वगैरे विकार होतात.
व्हिटॅमिन बी-१२ : (सायनोकोबाला माईन) : याने रक्तपुरवठा सुरळीत चालू होतो.
तसेच पंडुरोग (अॅनेमिया) वाढविण्यासाठी तसेच पोषक आहार यात प्रथिने. खनिजद्रव्ये सतत येत असते.
व्हिटॅमिन बी-१२ मधील कमतरतेमुळे अशक्तपणा येणे, भूक न लागणे. चक्कर येणे तसेच डोके दुखी वगैरे अनेक विकार होतात.
फॉलिक अॅसिड: हे औषध ह्रदयाच्या संरक्षणकरण्याकरिता फार उपयोगी पडते.
शरीरातील सर्व रक्तातील शिरा अथवा नस यांचा नेहमीचा उपयोग होतो. फॉलिक ॲसिड घेतल्याने शरीरावर कांती टवटवीत दिसते. तसेच मेंदू नेहमी जागरूक असतो.
फॉलिक अॅसिडची कमतरता व्हिटॅमिन बी-१२ची कमरतता ताबडतोब दिसून येते.
यात (अॅनेमिया) रक्त कमी होणे, केस गळणे वगैरे विकार होतात.
व्हिटॅमिन सी: हे एक अत्यंत उपयुक्त तसेच गुणकारी औषध आहे. याने रक्तपुरवठा नियमितपणे सुरुळीत चालू राहतो. तसेच दात व आपली हाडे व स्नायू चांगले बळकट होतात. सर्दी, ताप व खोकला याने व्हिटॅमिन सी घेतल्याने ताबडतोब बरे वाटते रक्तदाब कमी होते. कोलॅस्टेरॉल ताबडतोब कमी होते.
व्हिटॅमिन सीची कमतरता दातातून रक्त येणे तसेच सांधे दुखणे. जखम लवकर बरी न होणे. नाकातून रक्त येणे, भूक न लागणे, पायात बळ न येणे अथवा स्नायू दुखणे तसेच अपचनाचा त्रास होणे.
व्हिटॅमिन डीः सूर्यप्रकाशाकरिता अत्यंत उपयुक्त म्हणजे व्हिटॅमिन डी. हाडे व स्नायू बळकट करण्याकरीता व्हिटॅमिन डी अत्यंत उपयुक्त असते. कोणतेही जखम भरून काढण्याकरिता सूर्यप्रकाशाने जखम लवकर भरून निघते. आपल्या शरीरात नेहमी कॅलरीच आणि फॉस्फरस यांचा नेहमी उपयोग होतो. यामुळे शरीरातील हाडांना बळकटी मिळते. लहान मुलांना मुडदूस (रिकेट) यात याचा चांगलाच उपयोग होतो. लहान मुलांना मुडदूस झाल्यास त्याला कॉडलिव्हर तेल लावावे आणि उन्हात खुशाल फिरू द्यावे. त्याने मुडदूस नक्कीच बरा होतो.
व्हिटॅमिन ई: २१व्या शतकात व्हिटॅमिन ईचा शोध लागला व त्याने बऱ्याच चांगल्या गोष्टी पाहावयास मिळाल्या. विशेषतः स्त्रिया व मुलींना व्हिटॅमिन हे वरदानच मिळाले आहे. व्हिटॅमिन ई चोळल्यास शरीराची कांती तजेल दिसते. तसेच तोंडावरील आलेलं बारीक पुरळ अथवा डाग व्हिटॅमिन चोळण्याने त्वरीत नाहीसे होतात. आज एकंदर जवळजवळ ऐंशी लोकांना व्हिटॅमिन ई चे उपयोग दिले आहेत. पायात अथवा हातात बळ येणे तसेच मेंदूवर थोडा परिणाम होतो म्हणजे, विसरणे, न आठवणे अथवा न ओळखणे यासाठी व्हिटॅमिन ईचा चांगला उपयोग होतो. थोडा वेळ लागतो पण उपयोग होतो व स्नायंना बळकटी येते. व्हॅटमिन ई मुळे अनेक व चांगले फायदे होतात मात्र ते डॉक्टरला विचारणे करणे श्रेयस्कर आहे.
खनिजद्रव्ये: याला आपण मिनलर्स असे म्हणतो. खनिजमध्ये दोन प्रकार असतात.
एक म्हणजे सूक्ष प्रकार व दुसरा म्हणजे अतिसूक्ष्म प्रकार. उदाहरणार्थ कॅल्शियम व लोह हे सूक्ष्म प्रकार असतात. ते आपल्या डोळ्यांनी अगदी सहज दिसतात. त्याचे उपयोग वर दिलेले आहेत. लोह म्हणजे लोखंड हे लोह रक्तात असतात. अतिसूक्ष्म द्रव्ये म्हणजे पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस वगैरे यांचे उपयोगही पुढे दिलेले आहेत.
क्रिनियम: हे साखरेवर विघटन करण्यात येते.
आयोडिन: आपल्या थायरॉक्सीन नावाचे पदार्थ सुधारण्याकरिता वापरतात.
लोह: हे आपल्या रक्तातील पेशी हिमोग्लोबिन नावाचा एक पदार्थ असतो. त्याने रक्ताचे खूप काम करतो.
पाणी: साधारणपणे मनुष्य प्राण्याला पाण्याची नितांत गरज असते. प्रत्येक माणसाला दर दिवसात सात ते आठ ग्लास पिण्याच्या पाण्याची नितांत गरज असते. यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात.जर दुपारच्या वेळी चांगले संतुलित आहार घेतल्यास पाण्याची आणखीन जास्त गरज असते.
-श्री. मदन देशपांडे
Leave a Reply