पं. बापू पटवर्धन यांचा जन्म २४ ऑक्टोबर १९३६ रोजी झाला.
तबलावादनाच्या क्षेत्रात ज्यांचे नाव घेतले की ऐकणारा ‘क्या बात है?” असे आदराने उदगार काढले जात असे त्यापैकी एक ज्येष्ठ तबला वादक म्हणजे ‘पी. व्ही. पटवर्धन’. त्यांच्या नावाच्या आद्याक्षरांपेक्षा ‘बापू पटवर्धन’ या नावाने ते अधिक परिचित होते . थिरकवाँ खाँ साहेबांच्या शैलीचे अभ्यासक, विश्लेषक आणि प्रसारक म्हणून बापू पटवर्धन यांना सर्वजण ओळख असत. बापू पटवर्धन हे चिंतनशील तबलावादक म्हणून ज्ञात होते. बापू पटवर्धन यांनी आपले काका तसेच गुरू अहमदजान थिरकवा यांच्याकडे तबल्याचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी थिरकवा घराण्याच्या वादनाचा प्रसार केला. बापू पटवर्धन तबल्याकडे कदाचित वळलेही नसते. वडील लहानपणीच गेल्यामुळे त्यांचे काका गोपाळराव ग्वाल्हेरहून संगीताचे शिक्षण सोडून या मुलांना संभाळायला आले. काका अविवाहीत होते. त्यांनी बापूंच्या वडील भावाला, बाळूला गाण्याची तालीम सुरू केली. पुढे बाळू उत्तम गायक झाला.त्याला तबल्याची साथ मिळावी म्हणून बापूंना काका शिकवू लागले.बापूंनी मॅट्रीक पर्यंत शालेय शिक्षण घेतले व रोजगारी करता तबल्याच्या शिकवण्या घेतल्या.महीना १५-२० रूपये मिळायचे. त्याच वेळी त्यांची ओळख गोविंद परसतवारांशी झाली. गोविंद अमीर हूसेन खांसाहेबांकडे शिकायचे. बापूनी पं निखिल घोषकडे शिकावे अशी गोविंदरावांची ईच्छा होती. परंतु पैशाअभावी हे शक्य नव्हते. शेवटी गोविंदरावांनी त्यांना शिक्षण दिले. या काळामधे बापूंचे नांव एक उत्तम संगतकार म्हणून झाले.पंडीत कृष्णराव पंडीत साथीला बापूंना घेत.
याच सुमारास घरच्या सांपत्तिक परिस्थितीमुळे बापू पटवर्धन यांनी सेंट्रल रेल्वे,माटुंगा वर्कशॉपमधे ॲप्रेंटीसची नोकरी घेतली. तबल्याचे शिक्षण मागे पडले, परसतवारांचे निधन झाले. बापूंनी मात्र रेल्वेतल्या नोकरीत लक्ष घालून इंजीनियरींगचा डिप्लोमा मिळवला व वर्कशॉप सुपरीटेंडेंट पर्यंत प्रगती केली.कर्मधर्म संयोगाने १९७२-७३ मधे उस्ताद थिरकवांची नियुक्ती NCPA या संस्थेने केली. खांसाहेबांना उतरत्या काळात थोडे उत्पन्न मिळावे व मुंबईच्या होतकरू वादकांना फुकट शिक्षण मिळावे असा हा प्रयोग होता. परंतु वर्ग सुरू झाल्यावर योग्य दर्जाचे विद्यार्थी मिळेनात. नारायण जोशी, आनंद शिधये व डेगवेकर यांनी जबरदस्तीने बापूना या वर्गात पाठवले. खानसाहेबांना पैशाची नड होती ( जी कायम असते) त्यामुळे ‘माझा मेहेर देवून गंडा बंधन शागीर्द झाल्याशिवाय शिकवणार नाही’ अशी त्यांनी अट घातली. ८-१० जणांनी रू. १०० ते ५०० कुवतीप्रमाणे देवून गंडे बांधले व शिक्षण सुरू झाले. हे लक्षात ठेवले पाहीजे की बापूंना या वेळेपर्यंत थिरकवांची ओढ नव्हती, परंतु या वर्गात जे थोडेफार शिक्षण मिळाले ,त्यांनी ते प्रभावीत झाले. थिरकवांचे निधन थोड्याच वर्षात झाले. तरीही त्यांच्या रेकॉर्ड्स, कॅसेट्स वगैरै गोळा करून त्यांनी एकलव्यासारखे अध्ययन केले. थिरकवांकडे शिकतांना बऱ्याच शिव्या खाव्या लागत.१-२ विद्यार्थी घाबरून येईनासे झाले, तथापी बापूंनी त्यांच्याशी चिकाटीने वाद घालून वादनातील इंगीते हस्तगत केली. Emergency चा काळ असल्यामुळे काहीवेळी बापू गैरहजर असत. त्यावेळी थिरकवा बेचैन असत. इतर वेळी बापू आले की ‘अरे पटवर्धन, मेरे बाजू आके बैठ’ असे प्रेमाने सांगायचे. थिरकवांचा प्रभाव बापूंवर एवढा पडला की त्यांनी मुदतपूर्व राजीनामा दिला व थिरकवा बाजाला वाहून घेतले. बापूंकडे एवढे कसब असतांना त्यांना फारशी प्रसिद्धी मिळाली झाली नाही. बापूंना हे पटले नाही. अलीकडे त्यांना कलकत्याहून निमंत्रण आले.ते लगेच तयार झाले.त्यांनी स्वत:च अटी सांगीतल्या. मला बिदागी नको,गाडी खर्च नको कारण रेल्वे पास आहे. कोणाच्याही घरी राहीन, शाकाहारी जेवण हवे. या दिवसात असा कलाकार मिळणं कठीण. परंतु आब राखल्याशिवाय मान मिळत नाही. मान मिळाल्याशिवाय लोक तुमच्या मताचा आदर करत नाहीत,ही वस्तुस्थिती आहे.
बापू पटवर्धन यांनी उस्ताद थिरकवांच्या वादन शैलीवर ‘तबल्याचा अंतर्नाद’या नावाचे पुस्तक लिहीले आहे. बापू पटवर्धन यांनी गेले ९-१० वर्षे ब्लड कॅन्सरने आजारी होते. त्यांनी १५-२० केमो घेतल्या होत्या. त्यांनी कॅन्सरलाही मात दिली होती, असे त्यांचे शिष्यगण सांगतात. ३० किमो झाल्यानंतर त्यांनी कोलकात्याला जाऊन कार्यक्रम सादर केला.
बापू पटवर्धन यांचे १३ जून २०१९ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply