पंडित जितेंद्र अभिषेकी म्हटले की त्यांचे ‘ कट्यार काळजात घुसली ‘ हे नाटक आणि असंख्य नाट्यगीते डोळ्यासमोर येतात . पंडितजीना सर्वजण सन्मानाने बुवा म्हणत असत . त्यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२९ रोजी गोव्यातील मंगेशी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बळवंतराव असे होते. त्यांच्या वडलांनी पंडितजींना सुरवातीचे हिंदुस्तानी संगीताचे धडे दिले. त्यानंतर पंडितजींनी जगन्नाथबुवा पुरोहित आणि आझम हुसेन खा [ आग्रा घराणा ] यांच्याकडे शिक्षण घेतले.त्याचप्रमाणे गुलुभाई जसदनवाला म्हणजे अत्रुली घराणे म्हणजेच जयपूर घराणे यांच्याकडे शिक्षण घेतले.
पंडितजींनी ख्याल मध्ये वेगळी पद्धत म्हणजे स्टाईल निर्माण केली ती अभिषेकी घराणा मह्णून ओळखली जाते .
पंडितजी संस्कृत भाषेचे पदवीधर होते ते काही काळ आकाशवाणीवर होते. जेव्हा अनेक संगीतकार , वादक यांच्याशी त्यांचा परिचय झाला तेव्हा त्यांनी अनके ठिकाणी आकाशवाणीवर आणि अनके ठिकाणी कार्यक्रम केले. पुढे त्यांना भारत सरकारने आझम हुसेन खान शिष्यवृती दिली.
पंडितजींनी देश-विदेशात असंख्य कार्यक्रम केले. पंडितजीनी अमरिकेमध्ये असलेल्या पंडित रविशंकर यांच्या शाळेतही संगीत शिकवले. त्यांना असंख्य पुरस्कार मिळाले त्यात पदमश्री , होमी भाभा फेलोशिप , बालगंधर्व पुरस्कार , संगीत नाटक अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाले. खरे तर त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी खूप मोठे आहे. आजही त्यांची असंख्य नाट्यगीते सर्वांच्या ओठावर आहेत. अशा महान गायकाचे ७ नोव्हेंबर १९९८ रोजी निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply