पं. प्रभाकर कारेकर यांनी तीन दशकांहून अधिक काळ शास्रीय संगीत क्षेत्रात बहुमोल योगदान दिले आहे. मूळचे गोव्याचे असलेले कारेकर आग्रा आणि ग्वाल्हेर घराण्याच्या शैलीची साधना करतात.
पं. सुरेश हळदणकर हे त्यांचे गुरु. त्यांच्यासह पं. जितेंद्र अभिषेकी आणि पं. सी. आर. व्यास यांचे संगीत संस्कारही कारेकर यांच्या गाण्यावर झाले.
त्यांनी गायलेली ‘हा नाद सोड सोड’, ‘नभ मेघांनी आक्रमिले’, ‘राम होऊनि राम गा रे….’ अशी अनेक गीते लोकप्रिय आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply