पुजारी मंडळींचा कारभार, जगदंबेच्या नांवें चालतो ।
भाविकामधील अज्ञानाचा, उपयोग करूनी घेतो ।।१
पूजेमधल्या विधी करिता, आग्रह त्यांचा चालत असे ।
भक्तीरसाचे महत्त्व असूनी, त्याच्यांत त्यांना रस नसे ।।२
व्यवहारीपणाचे रूप आणूनी, बाजारी वृत्ति दाखविती ।
धर्माचे नाव लावूनी, भोळ्या भक्तांना लुटत असती ।।३
पुरोहित असा असावा, धर्माची करि उकलन ।
भक्तीमार्गाच्या वाटसरूंना, योग्य मार्ग देयी दाखवून ।।४
प्रभूचे मंदिरी नेवून त्यानें, चिंतन करण्या सांगावे ।
चंचल मनास प्रभू भजनीं, एकाग्र करण्या शिकवावे ।।५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply