नवीन लेखन...

पुरखुती मुक्तांगण (उगवता छत्तीसगड – २)

रायपुर पासून २० किमी अंतरावर रायपुर जगदलपुर हायवेवर २०० एकर परिसरात पसरलेले हे कला प्रदर्शन उद्यान म्हणजे अफाट कल्पनाशक्तीचे, डोळ्याचे पारणे फिटविणारे नयनरम्य ठिकाण आहे. नव्या रायपुरशी उत्तम रस्त्याने जोडलेले असे हे कला प्रदर्शन उद्यान आहे.याचे उद्घाटन राष्ट्रपती अब्ब्दुल कलाम यांनी २००६ साली केले. तेंव्हापासून या उद्यानाचा  सतत विकास चालूच आहे.ह्या कला प्रदर्शन उद्यानात फेरफटका मारताना छत्तीसगड राज्याची विविधता पर्यटकाना संमोहित करते.आधुनिक भौतिक विज्ञाना बरोबर मानवी संस्कृतीची जीवन वाहिनी  म्हणजे बोली भाषा. त्याच प्रमाणे नृत्यकला,संगीत,शिल्पकला, चित्रकला(पेंटिंग) याही तितक्याच आवश्यक आहेत.असा सकारत्मक दृष्टीकोन ठेऊन या राज्याचा अनमोल वारसा म्हणून मुक्तांगणाची निर्मिती केलेली आहे.

सांस्कृतिक व पारंपारिक कलाकृतींची सांगड घालून त्या मधून रोजगार निर्माण करणाऱ्या संस्था,तयार  करण्याचे प्रकल्प हे कला प्रदर्शन उद्यान तयार करीत आहे.निसर्गाचे वरदान,जंगले(रामायणातील दंडकारण्य), बस्तर मधील शेकडो आदिवासी जमाती, त्यांच्या चालिरिती, पुराणकालीन देवळे, अनेक देवता या सर्व घटनांवर आधारीत उभारलेला  छत्तीसगड राज्याचा भरजरीत साडीचा पदर म्हणजे हे  पुरखुती मुक्तांगण आहे.ह्या पुरखुती मुक्तांगणाच्या प्रवेशद्वारावरील चित्रे, कोरीव काम असलेले देव देवतांचे पुतळे पाहताच आपण अवाक होतो. धातुकलाव लोह्कला यांनी बनविलेल्या आराध्य देव देवतांच्या मूर्तीपुढे लांबच लांब छत्तीसगड  चौक आहे. ह्या छत्तीसगड  चौकाच्या दोन बाजूनी १८म्हणजे एकदंर ३६ (छत्तीसगड ) असे उंच कोरीव स्तंभ आहेत.प्रत्येक स्तंभावर वेगवेगळी कलाकुसर केलेली दिसते.दोन खांबांच्या बाजूनी झाडांची लागवड केली आहे. पुढे बैगा चौकात शूर वीरांच्या मूर्ती,अबुजमाडीया जंगलाचे वन्य जीवन,घनदाट जंगलातील माडिया जमातीचे नर्तक,विविध वादये  पारंपारिक दागिने व शृंगार केलेल्या माडिया महिला या जवळ जवळ २० ते २५ समुहाचा एकत्रित चाललेला नाच करणाऱ्या पुतळ्यांच्या स्वरूपातील दृश्य तयार केली आहेत.हा मूर्तीमंतदेखावा इतक्या कलात्मकतेने उभा केले आहे की त्याचे वर्णन करण्यास शब्द अपुरे आहेत.

पुरखुती मुक्तांगणाच्या परिसराच्या मध्यात प्रसिद्ध भोमरदेव मंदिराची भव्य प्रतिकृती आहे. त्यालाच लागून १५ तरुण आदिवासी आणि त्या वर उभा असलेला ढोल वाजविणारा तरुण आदिवासी असे दहीहंडी सारखा मनोरा तयार केला आहे. ह्या शिल्पातील आदिवासींच्या चेहऱ्यावरचे जोश असलेले हावभाव दिसून येतात. ह्या मनोऱ्याच्या बाजुला, माडिया व गौड आदिवासी जमातीचे खेडे उभारलेले आहे. ह्या खेडयात पारंपारिक पध्दतीची झोपडीदाखविली आहे. त्या झोपडीच्या समोर अंगण,दारात नटलेली तरुण बाई व पुरुष,पडवीत शेतीची अवजारे, स्वयंपाक घरातील त्यांच्या पद्धतीची भांडी,विविध पद्धतीचेजवळ जवळ १००  रंगीत मुखवटे,ज्यात शिंग असलेले बायसनचे डोके तयार केले आहे. ह्या आदिवासी लोकांमध्ये  लग्न संस्था अतिशय पक्की आहे. याची माहिती ह्या कला प्रदर्शनात मिळते. लग्न  ते ठरविण्याची जागा म्हणजे “गोटूल” हे उत्तम शाकारलेले घर असते. ह्या गोटूल मध्ये रात्रभर होतकरू नवरा नवरी एकमेकांशी हितगुज करतात. ह्या हितुगुज कार्यक्रमात स्त्री सुख घेण्यास बंदी असते. जर मने जुळली तरच पुढे थाटात लग्न आणि मग संसार सुरु होतो.पुरखुती मुक्तांगण कला प्रदर्शनात अनेक आदिवासी कला विकसित करण्यासाठी, कार्यशाळा घेण्यासाठी अनेक भवने बांधलेली आहेत. ह्या भवनात ठराविक दिवशी संध्याकाळी नाच गाण्याचे कार्यक्रम दिव्यांच्या रोषणाईत सादर केले जातात. भर दुपारच्या भाजून काढणाऱ्या उन्हात हा अवाढव्य प्रकल्प पाहताना तहान व  भूक विसरलो होतो. अशा तर्हेचे मुक्तांगण उभारणाऱ्या कल्पक संस्थेचे कौतुक मनापासून करावेसे वाटते. ही जागा उज्वल भविष्य काळाचा आवाज आहे. पुरखुती मुक्तांगण कला प्रदर्शनाची दारे वर्षभर सूर्योदय ते सूर्यास्त कायमच उघडी असतात.

गॅन्गरेल धरण परिसर: रायपुर जगदलपुर (रायपुरपासून११०कि.मी.) धामतरी  गावापासून १२ किमी अंतरावर महानदी (ओडीसा मधून येणाऱ्या) नदीवर हे अवाढव्य धरण बांधले असून ह्या धरणानेछत्तीसगड राज्याचा कायापालट केला आहे.१९७८ मध्ये याचे उद्घाटन इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले. ह्या धरणाची उंची ४७ मीटर असून लांबी २ कि.मी. आहे. ह्या धरणामुळे समुद्रासारखा प्रचंड मोठा जलाशय तयार झाला आहे.१० मेगावॉट वीज तयार होण्याची क्षमता असलेल्या ह्या धरणामुळे आजच्या घडीला छत्तीसगड  राज्य विविध पद्धतीने वीज उत्पन्न करणारे ( १०० टक्के ) यशस्वी असे एकमेव राज्य म्हणून ओळखले जाते. आमच्या ८ दिवसाच्या वास्तव्यात १२०० ते १३०० कि.मी. प्रवासाच्या क्षेत्रात कुठेही १ मिनिटही वीज गेल्याचा अनुभव आला नाही. हा संपूर्ण परिसर म्हणजे एखादे नन्दनवनच आहे. सूर्यास्ताच्या संधीप्रकाशात उजळून जाणारा जलाशय म्हणजे चित्रकाराचे दिवा स्वप्नच आहे असे वाटते.जलाशयाच्या बाजूनी उत्तम बाग, नाना तर्हेच्या फुलांचे,  हिरव्यागार झुडपांचे ताटवे ह्यांची लागवड केली आहे. हा नयनरम्य आनंद मनमुराद लुटण्यासाठी छत्तीसगडपर्यटन विभागाने  शिशवी रंगात राहण्यासाठी  प्रशस्त कॉटेजीस् तयार केली आहेत.जागोजागी धरण व जलाशय पाहण्यासाठी गॅलरीज बांधलेल्या आहेत. जलाशयातबोटिंगची सोय केली आहे. संपूर्ण परिसर इतका उत्तम पद्धतीने उभारलेला आहे, की आपण त्याच्या प्रेमातच पडतो.

माअंगार मोती मंदीर जलाशयाच्या काठावर असून मनोकामना पुरी करणारी देवता म्हणून प्रसिद्ध आहे. ह्या हिरव्या गार झाडीच्या परिसारातून जाणारा उत्तम रस्ता मनाला शांती देणारा असून त्या रस्त्यावरून जाताना या गॅन्गरेल धरणाकडे आपली पावले आपोआप  वळतात.

— डॉ. अविनाश वैद्य.

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..