*पुरी गर्वाने टम्म फुगली,
बशीत ऐटीत ढिम्म बसली,
बासुंदीने मग तिला पाहिली, तिला कशी चटकन बुडवली*,
*चिंगुराव, चिंगुराव,
केवढा तुमचा तोरा,
पेरू खाता चोचीने,
ढंग तुमचा न्यारा*,–!!!
*मनीमाऊ, मनीमाऊ
टपोरे तुमचे डोळे,
शेपूट आपली फिस्कारत,
करता गोल वाटोळे*,–!!!
*खारुताई, खारुताई,
काय खाता लपवून,
कोणी आले की कशा,
सुळकन जातां पळून*,–!!!
*वाघोबा, वाघोबा,
केवढा तुमचा दरारा,
नुसते पाहून तुम्हाला,
घाम फुटतो जगाला*,–!!!
*मुंगीताई मुंगीताई ,
निघालात तरी कुठे,
केवढी ही लगबग,
काम तुमचे मोठे*,–!!!
© हिमगौरी कर्वे.
Leave a Reply