नवीन लेखन...

रातकिडे !

या पृथ्वीतलावर हजारों प्रकारचे कीडे विचरण करतात, पैकी काही दिवसा तर काही रात्री म्हणजेच अंधारात!

मनुष्य जातीमध्ये देखील अशा प्रकारचे कीडे असतात,जे कायम अंधारात राहून कट कारस्थाने करत असतात.कुणाच्याही नजरेस न पडता गुप्तपणे आपले डाव टाकत असतात. हे कीडे उघडपणे वावरत नाहीत,कारण त्यांचे कार्य कुकर्म असते.जगातील बहुतेक भांडणे ही याच कुटील लोकांनी लावलेली असतात.आग लाऊन पुन्हा विझवण्याचे नाटक करणारे हे लोक असतात.

तोंडावर गोड बोलणारे, पोटात शिरून माहिती मिळवणारे हे कपटी लोक ओळखणे मोठे कठीण असते. त्यांची वाणी गोड असल्याने, कुठल्याही वादात ते दिसत नाहीत, परंतु केसांनी गळा कापणारे हे लोक मोठे घातकी असतात.पोटात एक आणि ओठात दूसरे अशा फीतूरीचे असतात.उपकाराची जाण नसणारे कृतघ्न असे हे लोक म्हणजे ब्याद असते. अडचणीच्या वेळी लोटांगण घेणारे व इतरांच्या अडचणीत मुजोरी करणारे हे तत्वहीन लोक नतभ्रष्ट असतात.

कुठलेही तत्व, सिद्धांत नसलेले हे माथेफिरू आपल्याच कारस्थानात अडकतात.मूर्ख असून शहाणपणा करत असतात आणि स्वतःचे हसू करुन घेत असतात.अत्यंत मत्सरी,अंहकारी हे लोक स्वाभिमान शून्य असतात.हे कीडे एकटेदूकटे वावरत नाहीत,तर आपली एक टोळी तयार करतात, ठरवून हल्ला चढवतात आणि स्वतःच घायाळ होतात, नष्ट होतात.

महायुद्ध असो की दोघांमधलं भांडण असो, कुणीतरी लावल्याने होते,ह्यास बळी पडणारे अज्ञानी किंवा अंहकारी असतात, सूडभावना, द्वेष भावना या दुष्ट भावना डोके वर काढतात आणि प्रवृत्ती पुढे येतात.

उघडपणे, स्पष्टपणे वागण्या बोलण्याचे धारिष्ट्य नसल्याने, आपण जे काही करतो ते चूकीचे असल्याने समोरासमोर येत नाही, अंधारात कारस्थाने रचून छळत राहतात. कोणत्याही चांगल्या कार्याला विरोध करणे, कंड्या पसरविणे, आरोप करणे, विपर्यास करणे असे कुटील कारस्थाने आखत असतात.सत्य आणि न्याय त्यांना नको असतो.हमरीतुमरीवर येणारे हे लोक खूप चिल्लर असतात. या अशा रातकिड्यांचे उच्चाटन केले गेले तरच निकोप असे वातावरण निर्माण होऊ शकते.

अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे, ह्यांच्या कारस्थानाला बळी पडू नये,उलट कारस्थाने उघड करावीत, आणि या जमातीचा नायनाट करावा.

– ना.रा.खराद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..