रात्र वाढत चाललीय
हळूहळू बाहेरचे आवाज एकेक कमी होतील
काही कर्कश्श, काही गुणगुणते, काही सवयीचे,
मग वाढतील आवाज किर्रर्र रातकिड्यांचे
लांब कुठेतरी घुमणाऱ्या घूत्काराचे
हळूहळू सगळे बाहेरचे आवाज थांबतील… निशब्द
मग सुरु होतील आतले मनाचे आवाज, त्याचे दबके शब्द
दिवसाच्या कोलाहलात गर्दीत विरलेले
गुदमरून आत आत कोंडलेले, सारे काहीं वाहत जाते
विचारांची एकच झुंबड गर्दी होते
त्याची गती अशी कि ध्वनीलाही मागे फेकते
क्षणात इथे क्षणात तिथे, सप्त पातळ फिरून येते
काही मागचे, काही पुढचे गोफ गुंफत रात्र जाते
मिटतात, थकतात पापण्या अलगद
अन रात्र सारी मिटून जाते…
— वर्षा कदम.
Leave a Reply