रावण नव्हता कुणी राजा, ती होती व्यक्ति
व्यक्तीचा तो इतिहास नव्हता, ती होती प्रवृत्ति….१,
आजही दिसती कित्येक आम्हा, रावण या जीवनीं
कशी रंगेल जीवन कथा, रावणा वांचूनी…२,
विरोधात्मक बुद्धी तुमची, अडथळे आणते
क्रोध, लोभ, अहंकार गुणांनी, प्रवाहाला रोकते…३,
सद्गुणांचा पाया खोलवर, जेवढा तो गेलेला
रावण वृत्ति हार जाईल, त्याच मग वेळेला….४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply