मिळता मजला बाह्य एकांत, छळते गर्दी विचारांची
मन गुंतविण्या कुणी नसता, चलबिचल होते भावनांची…१,
शब्द वर्णांचा घेवून आधार, भावना काढी मार्ग आपला
आविष्कार घडविण्यासाठी, विचार करितो मदत तिला…२,
शब्दांना नटवी थटवी, ध्वनी लहरी नि सूर गेयता
अलंकार मिळता अंगी, रचली जाते एक कविता…३
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply