रडवून जाणाऱ्या हसवून जाणाऱ्या ग
बाई ग या कथा तुझ्या व्यथा तुझ्या ग
कोणाला न कधी उलगडून त्या जाणार ग
बाई ग हसते तू बोलते तू ग
उरातले दुःख हलकेच लपवते तू ग
कोणाला न कधी ते दुःख तू सांगणार ग
रडले काय विझले काय नयन तुझे ग
बाई ग कोरड्या डोळ्यांत पाणी थिजले ग
कोणाला न कधी अश्रू कोरडे ते दिसणार ग
हरवली तू मिटली तू मनातून तुटली ग
बाई ग भावनांच्या बाजारात बंधात विझली ग
कोणाला न कधी मनाची तुझ्या तार कळणार ग
बयो जन्म तुझा बाईचा ग
बाई ग सोशिक सहन करण्यात तू विझली ग
कोणाला न कळली तू स्त्री शब्दांत व्यथा उरली ग
रडली ग भांडली ग हक्कासाठी झिजली ग
बाई ग परी हृदयातून वीण न झंकारली ग
कोणाला न कळली तुझ्या मनाची घालमेल ग
सासर जपले माहेर जपले तू ग
आला गेला तुझाच गोतावळा समजली तू ग
कोणाला न कळली परी तुझ्या नात्याची तार ग
जन्मोजमीच्या कथा या साऱ्या तुझ्या ग
स्त्री जन्मा ही तुझी कहाणी ग
कोणाला न कळते मन तुझे स्त्री जन्म हा तुझा ग
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply