नवीन लेखन...

महाराष्ट्रातील मोठे नेते राधाकृष्ण बाळासाहेब विखे पाटील

महाराष्ट्रातील मोठे नेते राधाकृष्ण बाळासाहेब विखे पाटील यांचा जन्म १५ जून १९५९ रोजी झाला.

राधाकृष्ण विखे पाटील हे महाराष्ट्रातील बडे नेते आहेत. नगरच्या राजकारणावर त्यांची मजबूत पकड आहे. विशेष म्हणजे नगरमधील सर्वच नेते नगर जिल्ह्यापुरताच विचार तरत असतात. त्याला कारणही तसंच आहे. नगर हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्यात एकूण 12 विधानसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे बारा आमदारांची बेगमी करून राज्याच्या राजकारणात उपद्रव्यमूल्य निर्माण करण्याचा प्रत्येक नेत्याचा प्रयत्न असतो.

विखे-पाटील घराणं हे राजकारणातील बडं नाव आहे. नगरच्या राजकारणावर मांड असलेलं हे घराणं आहे. विखे-पाटील घराण्यातील तिसरी पिढीही आता राजकारणात आली आहे. सहकार, समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रात विखे घराण्याचा दबदबा आणि लौकीक आहे. सामाजिक, राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घराण्यात जन्मलेल्या राधाकृष्ण विखे यांना लहानपणापासूनच समाजकारणाचं बाळकडू मिळालं होतं. त्यांचे आजोबा विठ्ठलराव विखे-पाटील यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे राज्यातील पहिले पब्लिक स्कूल प्रवरानगरला सुरू केले. याच पब्लिक स्कूलमध्ये राधाकृष्ण विखे यांना पहिलीत प्रवेश देण्यात आला. आजोबांच्या आग्रहाखातरच त्यांना वसतिगृहात घालण्यात आलं. तिथूनच राधाकृष्ण विखे त्यांच्यात सामाजिक जाणीव निर्माण झाली. या पब्लिक स्कूलमध्ये त्यांनी इयत्ता अकरावीपर्यंतचे शिक्षण घेतले.

अकरावीनंतर धुळे, कोल्हापूर कृषी विद्यापीठात शिक्षण घेत असताना ते सामाजिक कार्याकडे ओढले गेले. कोल्हापुरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी संपही केला होता. विखे घराण्याने नगरमध्ये सहकार क्षेत्रात मोठं योगदान दिलं आहे. आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना नगरमध्ये सुरू केला. त्यांचे आजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुरू केला. सहकार, समाजकारण आणि राजकारणात विखे-पाटील घराण्याचं मोठं योगदान आहे.

राधाकृष्ण विखेपाटील यांनी काँग्रेसमधून राजकारणास सुरुवात केली. 1986मध्ये ते युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. या काळात त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले. भारत निर्माण अभियानांतर्गत भंडारदरा ते जामखेड अशी पायी दिंडी काढली.

विखे यांच्या राजकारणाची सुरुवात खऱ्या अर्थाने 90च्या दशकात सुरू झाली. त्यांनी 1994मध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. आजही या मतदारसंघाचे ते निर्विवादपणे प्रतिनिधीत्व करत आहेत.

राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला. वडिलांपाठोपाठ राधाकृष्ण विखे यांनीही आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ते शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

वडिलांनी शिवसेनेत प्रवेश केला म्हणून राधाकृष्ण विखे-पाटील यांनाही शिवसेनेत प्रवेश करावा लागला होता. २०१९ मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राज्याचे विरोधी पक्षनेते असतानाही विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देऊन आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राधाकृष्ण विखे यांनी मुलासोबत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिले. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर ते कृषीमंत्री झाले होते.ते कृषीमंत्री असताना आपत्कालिन परिस्थितीत शेतकऱ्यांना भरभरून मदत मिळवून दिली होती २००९ पासून ते शिर्डी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. राजीनामा देण्याआधी ते काँग्रेसचे विधानसभेतील विरोधीपक्ष नेते होते. अहमदनगरमधील प्रवरा शिक्षण प्रसारक संस्थेचे ते प्रमुख आहेत.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनी विखे पाटील या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या. विखे पाटील यांनी राज्याचे कृषी व पणनमंत्री म्हणून काम पाहिले आहे. विखे पाटील हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राहिले आहेत.शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या विकासासाठी विखे पाटील यांचा मोठा वाटा आहे.

नगरमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील आणि बाळासाहेब थोरात यांचा संघर्ष सर्वश्रृत आहे. नगरवर पकड ठेवण्यासाठी या दोन्ही नेत्यांमध्ये कायम चुरस राहिली आहे. नगरमध्ये राजीव सातव, हर्षवर्धन पाटील, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांचा एक गट आहे. त्यामुळे या गटाचं आणि विखे-पाटील यांच्यातील संघर्ष नेहमीच पाहायला मिळतो. त्यातच थोरात यांचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चांगले संबंध आहेत. तर विखे घराण्याचं पवारांशी पटत नसल्याने नगरमध्ये हा संघर्ष नेहमीच पाहायला मिळतो.

राजकीय वाऱ्याचा अचूक अंदाज असणाऱ्या राज्यातील मोजक्या नेत्यांपैकी विखे पाटील एक आहेत. त्यांच्या वडिलांनी शिवसेनेत प्रवेश केला. वाजपेयींच्या मंत्रिमंडळात त्यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, अवज उद्योग खात्याचे कॅबिनेट मंत्रीपदही भूषविलं. पण शिवसेना-भाजपला घरघर लागल्याचं कळताच बाळासाहेब विखेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राधाकृष्ण विखे यांनीही युतीची सत्ता येत असल्याचं पाहून शिवसेना-भाजपशी चांगले संबंध ठेवले.२०१९ मध्ये पुन्हा युतीची सत्ता येणार असल्याचं लक्षात येताच आणि भाजपचाच मुख्यमंत्री होण्याची शक्यता वाटताच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु, राज्यात महाआघाडीचं समीकरण निर्माण झाल्याने त्यांच्या आकांक्षांवर पाणी फेरले गेले.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..