नवीन लेखन...

राधानगरी-दाजीपूर परिसर … सह्याद्री

Image © Prakash Pitkar….

राधानगरी-दाजीपूर परिसर … सह्याद्री …. कोल्हापूर-फोंडा (तळकोकण) रस्ता

रोहिणी नक्षत्रातले
ओथंबले आभाळ कोसळले घनघोर 
विजेच्या लखलख उजेडात उडाली पाखरे शिवारभर
माती पुण्यशील झाली
म्हणून टिळे लाविले भाळावर
पेरताना तीर्थ टाकून
जयघोष केला आम्ही तिफणीवर
मृगाच्या आवर्तात मूस गवसली
माझे मायमाऊली
डोळ्यांना पेलणार नाही एवढी पुण्याई पदरी आली
थेंबाच्या चांदण्या फांदीवर उतराव्या
तशा उतरत्या हारीहारीवर
रानोमाळ उन्मळून उगवल्या बीजांतले
सुगंध दरवळले दूरवर
मोरपंखी आभाळ संथ संथ हलक्याने
डोळ्यांत उतरले
तेव्हा मी नकळत विसरून गेलो
पुन्हा भवतालचे सगळे
बायामाणसांचे गजबज कामांतले
विसरल्या गेले
डोळ्यांवर फक्त हिंदोळ्यासारखे आभाळ तरळले
दोन राघू आले
आणि मला घेऊन गेले पंखांवर हिरव्या
मेघावी गल्बतात
मी स्वतःला विसरून पक्ष्यांच्या गाण्यात ….

इथल्या मातीत मी राबलो
एका प्राणांतिक प्रेरणेनं
जीव टाकला माणसांवर
झाडाझुडपांवर … उमलत्या चैतन्यावर
वळल्या झाडांचा दुखवटा
आपल्या देहावर घेतला
त्यांच्या डोळ्यांतला गलबला
माझ्या डोळ्यांतून गळाला
हिरवे चैतन्य जागवित गेले
तसे शिवारभर दीप उजळले
आपोआप झाडांचे हालते हिंदोळे गाणे झाले ….

आभाळ भरून येते पुष्कळ
पहिल्यासारखी बरसात नाही
नक्षत्रांमागून नक्षत्रं सरतात
तरीही मृदगंध दरवळत नाही
गावाकडला गलबला पुसट
ऐकायला येतो डोंगराकडून
अंधाऱ्या रात्री प्राण कासावीस होतो
जुन्या आठवणी स्मरून …..

— कविवर्य ना. धो. महानोर यांची रचना..

प्रकाश पिटकर
About प्रकाश पिटकर 43 Articles
मी आय.डी.बी.आय. बँकेत गेली ३४ वर्ष नोकरी करतोय. सध्या AGM म्हणून हैदराबाद इथे पोस्टेड आहे. मला ट्रेकिंग, फोटोग्राफी, प्रवास, दूरवरचे स्वतः वाहन चालवत प्रवास, वाचन अशा आवडी आहेत. मी गेली सतरा वर्ष महाराष्ट्र टाइम्सचा फ्री लान्स कॉलमनिस्ट आहे. माझे आता पर्यंत सहज दोन हजाराच्यावर लेख प्रसिद्ध झाले आहेत. मी मुख्यतः ठाण्याचा रहिवासी आहे. प्रवास वर्णन, व्यक्ती-संस्था चित्र, ऐतिहासिक वास्तू, निसर्गातले अनेक विषय.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..