नवीन लेखन...

रघुनाथ अनंत माशेलकर

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ या संघटनेचे माजी अध्यक्ष रघुनाथ अनंत माशेलकर यांचा जन्म १ जानेवारी १९४३ रोजी झाला. रघुनाथ अनंत माशेलकर यांना रमेश माशेलकर या नावानेही ओळखले जाते. रघुनाथ माशेलकरांचा जन्म कोकणातल्या माशेल गावाचा. बालपण मुंबईत गेलं. मुंबईतल्या पालिकेच्या शाळेतल्या शिक्षकांनी माशेलकरांचं आयुष्य घडवलं. त्यांच्या आई, हे त्यांचं प्रमुख प्रेरणास्थान!

शिवणकाम किंवा मिळेल ते काम करुन माशेलकरांच्या आई काही कमाई करत असत. एकदा त्या गिरगावातल्या काँग्रेस भवनात काम मागण्यासाठी गेल्या. संबंध दिवस तिथे उभं राहूनदेखील त्यांना काम दिलं गेलं नाही. त्या कामासाठी तिसरी उतीर्ण असणं आवश्यक होतं आणि माशेलकरांच्या आईंचं तेवढं शिक्षण नव्हतं. खोटं बोलून त्यांना कदाचित ते काम मिळवता आलं असतंही. पण तसं न करता, त्यांनी स्वतःच्याच मनाशी निर्धार केला. आज माझं शिक्षण नाही म्हणून मला काम मिळालं नाही, पण माझ्या मुलाला मात्र मी जगातलं सर्वोच्च शिक्षण देईन. हा निर्धार पुरा करण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ठ घेतले.

अकरावीच्या परीक्षेत रघुनाथ माशेलकर बोर्डाच्या मेरिटमध्ये आले. पण परिस्थितीमुळे त्यांनी पुढे न शिकण्याचं ठरवलं. इथेही आईच्या आग्रहामुळे त्यांनी बी. केम. ला प्रवेश घेतला आणि १९६९ साली मुंबई विद्यापीठाच्या रसायन अभियांत्रिकी विभागाच्या तत्कालीन संचालक प्रा. एम्‌. एम्‌ शर्मा या अत्यंत सृजनशील संचालकाच्या मार्गदर्शनाखाली, माशेलकरांनी आपली पी.एच.डी. ची पदवी प्राप्त केली. युरोपमधील सल्फोर्ड विद्यापीठात जाऊन पोस्ट डॉक्टरल संशोधनही केलं.

आयुष्यातली कमीतकमी १२ वर्षं तरी अनवाणी पायांनी चालणारा, सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करणारा हा माणूस, पुढे, इंग्लंडमध्ये, जिथे न्यूटनने सही केली आहे, त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारा पहिला मराठी माणूस ठरला. डॉ. माशेलकरांचा उल्लेख आला की त्याबरोबर लगेचंच आठवते ती त्यांनी जिंकलेली आगळीवेगळी हळदीघाटची लढाई! आपल्या सवानाच हळदीचे औषधी गणुधर्म माहिती आहेत. जखम झाल्यावर त्यावर हळद लावण्याचा रामबाण उपाय, आपल्या देशात पूर्वापार वापरला जातोय. असं असतांना, एक दिवस सकाळी पेपर वाचत असतांना, एका विचित्र बातमीनं डॉक्टरांचं लक्ष वेधलं. अमेरिकेने हळदीच्या औषधी वापरावर आपले हक्क असल्याचं त्या बातमीत म्हटलं होतं. थोडक्यात अमेरिकेने हळदीचं पेटंट घेतलं होतं.

बातमी वाचताच माशेलकर बैचेन झाले. आपल्याकडे अनेक पिढया चालत आलेलं हे ज्ञान, कोणीतरी स्वतःचं असल्याचा राजरोस दावा करतोय, हे योग्य नव्हे. यावर अमेरिकेशी न्यायालयीन लढाई करुन आपले हक्क आपण राखले पाहिजेत, असा पक्का विचार करुन डॉक्टर कामाला लागले. जोरदार न्यायालयीन लढाई झाली. हळदीचे गुणधर्म सांगणारे अनेक संस्कृत श्लोक, पाली भाषेत हळदीबद्दल लिहिले गेलेले संदर्भ, अनेक कागदपत्रं जमा करुन, त्या सर्वांचा अभ्यास करुन, डॉक्टर आणि त्यांच्या सहकार्यां नी ही अमेरिकेविरुद्धची हळदीघाटची लढाई जिंकली. यातून दोन चांगले परिणाम झाले. एक तर आपल्या ज्ञानाचे हक्क आपल्याकडे राहिले आणि दुसरा दूरगामी फायदा झाला. तो असा की आपल्या पारंपरिक ज्ञानाची किंमत आपल्याला आणि सार्याा जगाला कळली.

अमेरिकेसारख्या बलाढय राष्ठ्राला भारतीय ज्ञानाचं महत्त्व कळलं आणि आपण दुसर्यांमच्या ज्ञानावर आपला हक्क सांगायचा नाही हा धडाही मिळाला. हाच प्रकार बासमती तांदळाच्या बाबतीतही घडला. त्याचेही पेटंट माशेलकरांनी परत मिळवले. सर जगदीशचंध बोस यांनी बिनतारी संदेश यंत्रणेचा म्हणजे वायरलेसचा शोध लावला, पण त्या शोधाचं श्रेय मात्र मार्कोनीला मिळालं. कारण बोस यांनी पेटंट घेतलं नाही, ते सर्व करुन मार्कोनीने सर्व अधिकार स्वतःकडे घेतले. १८९८ मध्ये बोस यांनी वायरलेस शोधलं होतं. त्यानंतर १९९८ साली म्हणजे बरोबर १०० वर्षांनी बासमतीची लढाई जिंकून त्याचंही पेटंटं डॉ. माशेलकरांनी मिळवले.

बोस ते बासमती अशा या ज्ञानाचा हक्क मिळवण्याच्या प्रवासात डॉ. माशेलकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ओषधांपासून ते खतांपर्यंत, जीवनोपयोगी रसायनांपासून ते गृहिणींसाठी छोटे उद्योग वसवून देण्यापर्यंत, अनेक लहान मोठया व्यवसायात डॉ. रघुनाथ माशेलकरांनी मार्गदर्शन केलं. व्यवस्थापनापासून ते स्वतः प्रयोगशाळेत संशोधन करण्यापर्यंत जातीने काम केलं आणि आजही ते तितक्याच जोमाने कार्यरत आहेत. सकारात्मक विचारांचा प्रचंड उस्फूर्त असा प्रवाह अनुभवायचा असेल तर, डॉ. रघुनाथ माशेलकरांच्या सहवासात आयुष्यातले काही क्षण तरी घालवावेत; ते शक्य नसेल तर त्यांचे भाषण जिथे कुठे असेल तिथे ऐकायला जावं. तेही शक्य नसेल तर त्यांनी लिहिलेले भारताच्या प्रगतीच्या कल्पनांविषयीचे लेख वाचावेत. आणि मग आपल्या लक्षात येईल की, जगद्विख्यात रसायनशास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर हे, जबरदस्त सकारात्मक विचारांच्या मुशीतून घडलेलं, काही एक वेगळंच रसायन आहे.

भारताच्या अतिप्रचंड लोकसंख्येबद्दल आपण सर्वच जण चिंता व्यक्त करत असतो. पण त्याहीकडे पाहाण्याचा माशेलकरांचा दृष्ठीकोन आपल्याला, त्यांच्या सकारात्मकतेचं दर्शन घडवतो. ते म्हणतात, ‘भारताची भव्य लोकसंख्या हाच एक मोठा खजिना आहे. भारतात वैचारिक स्वातंत्र्य असल्यामुळे जेवढी माणसं जास्त, तेवढया नवनवीन कल्पना पुढे येण्याला वाव. त्यातच भारतातली ५५ टक्क्याहून जास्त मंडळी तिशीच्या घरातली आहेत. म्हणजे हा तरुणांचा देश, अनेक नवनवीन धडाडीची कामं करु शकेल. आणि भारतातली सांस्कृतिक विविधता देशाला अधिक सृजनशील बनवेल. ‘मराठीवर मनापासून प्रेम करणारे, मायबोलीतून विचार केल्यामुळे मी यशस्वी झालो’ असं सांगणारे डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर, आपल्या तरुणांसाठी, खास करुन मराठी युवकांसाठी स्फूर्तिस्थान ठरावेत!

डॉ.रघुनाथ माशेलकर म्हटले की भारतीय पेटंट्स संदर्भात लढाई,त्यांचा एनसीएल मधील काळ, सीएसआयआर मधील संचालकीय कारकिर्द, बौद्धिक संपदा हक्क चळवळ, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील उद्यमशीलता आणि अर्थकारण, नवोन्मेषक्षमता,सर्जनशीलता, आणि स्थानिक लोकांच्या पारंपरिक माहिती ,ज्ञान आणि अनुभविक शहाणपण यांचा सुमेळ साधून माहितीसंचयावर दिलेला भर, त्यासाठी पारंपरिक ज्ञानमाहितीचे अंकिय ग्रंथालय, त्यांचे विज्ञानाचे पंचशील आदि सारे डोळ्यांपुढे उभे राहते.त्यातील त्यांचे नेतृत्व सिद्ध झाले आहे. त्यांना मिळालेले विविध पुरस्कार, सन्मान आणि पदे नेहमीच भारतीयांचा आणि मराठी माणसांच्या अभिमानाचा ,कौतुकाचा आणि कुतुहलाचा विषय राहिले आहेत.
नोबल पारितोषिक वगळता बहुतांशी सारे सन्मान त्यांच्या नावावर जमा आहेत. आणि नोबल पुरस्कारही दूर नाही अशा टप्प्यावर त्यांचे कार्य सातत्याने चालू आहे. किंबहुना सारे पुरस्कार हे प्रतिक्रियास्वरुप त्यांच्या मागे लागले आहेत असे त्यांचे कर्तृत्व.विज्ञानाच्या क्षेत्रातील त्यांचे कार्य म्हणजे मातीतून उगवून गगनाला स्पर्शू पाहणारे. त्यामुळे त्यांचे चरित्र म्हटले की अपेक्षा वाढतात.

माशेलकरांचं चरित्र तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. अशा व्यक्तींच्या चरित्रातील कथावस्तू, नाटय़ आणि संघर्ष हे नेहमीच कादंबरीपेक्षा अद्भुत असतात. अशा व्यक्तित्वांनी आपल्या दैनंदिन आयुष्यातील युद्धाच्या प्रसंगांवर मात करत आपलं वेगळेपण कसं जपलं, हा कुतूहलाचा आणि प्रेरणेचा भाग असतो. या चरित्रात माशेलकरांनी मिळालेले सन्मान, त्यांचं कार्यक्षेत्र, त्यांनी भूषवलेली पदं यांचा सविस्तर उल्लेख आहे. पण माशेलकरांनी कठीण काळात निभावून नेलेले प्रसंग, त्यावर केलेली मात, त्यांच्या जीवनाला कलाटणी देणाऱ्या घटना आणि व्यक्ती यांची माहिती कमी प्रमाणात आहे. थोडक्यात, या पुस्तकात माशेलकरांचं कर्तृत्व मांडलं गेलं आहे, पण त्यामागील व्यक्तित्व समोर येत नाही.
डॉ.रघुनाथ माशेलकर – भारतीय बौद्धिक संपदेचा उद्गाता.
लेखक- अ.पां.देशपांडे,
प्रकाशन- ग्रंथाली, पृष्ठे- 170, किंमत- रुपये-225
‘व्यवसायाभिमुख संशोधन’ या तत्त्वाचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. ‘ज्ञान ही संपत्ती आहे ,तसेच ज्ञानातून संपत्ती निर्माण होते’, म्हणून ते ज्ञान व संशोधन कायदेशीररीत्या सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे ही त्यांची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरली आहे. औषधांपासून ते खतांपर्यंत, जीवनोपयोगी रसायनांपासून ते गृहिणींसाठी छोटे उद्योग वसवून देण्यापर्यंत, अनेक लहान मोठया व्यवसायात डॉ.रघुनाथ माशेलकरांनी मार्गदर्शन केलं.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..