नवीन लेखन...

बजाज समूहाचे दिशादर्शक राहुल बजाज

राहुल बजाज यांचा अल्पपरिचय:

राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ रोजी बंगाल प्रेसिडेन्सीमध्ये झाला.

‘बुलंद भारत की, बुलंद तस्वीर.. हमारा बजाज’ ही जाहिरात आठवत नाही असा एकही भारतीय असू शकत नाही. कारण १९८० च्या दशकात घरासमोर बजाज चेतक स्कूटर म्हणजे तो श्रीमंत माणूस असे समजले जायचे. या बजाज ग्रुपचे राहुल बजाज हे भारतातील यशस्वी उद्योजकांपैकी एक उद्योजक होते. पाच दशकांमध्ये बजाज समूहाला नावारूपाला आणण्यात राहुल बजाज यांनी प्रचंड योगदान आहे. बजाज हा व्यावसायिक घराण्याचे संस्थापक राहुल बजाज यांचे आजोबा जमनालाल बजाज हे होते. त्यांच्यानंतर आलेल्या प्रत्येक पिढीने घराण्याची व्यावसायिक परंपरा पुढे नेत त्यात अधिक भर घातली.

राहुल बजाज यांनी अर्थशास्त्र आणि विधीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. राहुल यांचे प्राथमिक शिक्षण कॅथेड्रल अँड जॉन कॅनन स्कूलमध्ये झाले. त्यानंतर सेंट स्टीफन्स कॉलेजमधून त्यांनी दिल्ली विद्यापीठाची अर्थशास्त्र (ऑनर्स) पदवी घेतली. मुंबई विद्यापीठाची लॉ पदवी घेतल्यानंतर त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एम. बी. ए. केले.१९६५ मध्ये त्यांच्या हाती बजाज उद्योग समूहाचा कारभार सोपविला गेला. त्यांनी आपल्या कुशल नेतृत्व शैलीने प्रतिकूल परिस्थितीत बजाज घराण्याचा व्यवसाय वाढवला राहुल बजाज १९६८ मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी या पदी रुजू झाले.

१९८० मध्ये बजाज ही स्कूटर निर्मितीमधील एकमेव कंपनी होती. त्यांच्या चेतक या स्कूटरला एवढी मागणी होती की, या स्कूटरकरिता १० वर्षांसाठीचा वेटिंग पिरीयड होता. पाच सहा वर्षानंतर स्कूटर करिता नंबर लागल्यावर ग्राहकाला स्कूटर मिळायची, त्यावेळी त्याचा आनंद गगनात मावत नसे. राहुल बजाज यांनी अनेक कंपन्यांचे अध्यक्ष म्हणून काम केले होते.

आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातील त्यांचे योगदान अमूल्य असेच होते. त्यांची २००६-२०१० या कालावधीकरिता राज्यसभेकरिता खासदार म्हणून नियुक्ती झाली होती. तसेच आय.आय.टी. रुरकीसहित ७ विश्वविद्यालयांची डॉक्टरेट ही मानद पदवीदेखील त्यांना प्रदान करण्यात आली होती. १९९० च्या दशकात भारतात उदारीकरणाचे वारे सुरु झाले आणि बजाज उद्योग समुहासमोर अनेक समस्यांचा डोंगर उभा राहिला. उदारीकरणामुळे आयात स्वस्त झाली आणि प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीला सुरुवात झाली.

गेल्या वर्षी राहुल बजाज यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पाच दशकांपासून त्यांनी बजाज ऑटोची धुरा यशस्वीरित्या सांभाळली होती. बजाज ऑटोला आघाडीवर नेण्यात राहुल बजाज यांना महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा होता. राहुल बजाज यांच्यानंतर ६७ वर्षीय नीरज बजाज यांच्याकडे बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली होती.

बजाज ऑटोच्या यशात मोलाचा वाटा राहुल बजाज सन १९६८ मध्ये बजाज ऑटोचे सीईओ झाले. यानंतर ३० व्या वर्षी जेव्हा राहुल बजाज यांनी ‘बजाज ऑटो लिमिटेड’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला, तेव्हा हे पद मिळविणारे ते सर्वात तरुण भारतीय असल्याचे सांगितले जाते. यानंतर बजाजने एका निरंकुश पद्धतीने उत्पादन केले आणि स्वत:ला देशातील सर्वांत मोठ्या कंपन्यांपैकी एक बनविण्यात यश मिळविले. वर्ष १९६५ मध्ये ३ कोटींच्या उलाढालीवरून सन २००८ मध्ये बजाजने सुमारे १० हजार कोटींची उलाढाल गाठली होती.

आर्थिक आणि व्यापार क्षेत्रातील राहुल बजाज यांच्या योगदाना मुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले होते, त्यात २००१ मध्ये भारत सरकारतर्फे पद्मभूषण, हार्वर्ड बिझनेस स्कूलकडून माजी विद्यार्थी अचिव्हमेंट पुरस्कार, नवभारत टाईम्स, अर्न्स्ट अँड यंग, सीएनबीसी टीव्ही १८ तर्फे लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार, फ्रान्सच्या राष्ट्रपतींकडून ‘नाइट इन द ऑर्डर ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ म्हणून नियुक्ती, भारत सरकारतर्फे १९७५ ते १९७७ दरम्यान ऑटोमोबाईल उद्योग विकास परिषदेचे अध्यक्षपद, १९७५ मध्ये राष्ट्रीय गुणवत्ता संस्थेतर्फे ‘मॅन ऑफ द इयर’, १९९२ मध्ये प्रिंन्स ऑफ वेल्सने त्यांना ‘प्रिन्स ऑफ वेल्स इंटरनॅशनल बिजनेस लीडर्स फोरम’च्या सदस्यपदी आमंत्रित केले. एफ.आय.इ. फाऊंडेशनतर्फे १९९६ साली राष्ट्रभूषण पुरस्कार, लोकमान्य टिळक स्ट्रटतर्फे २००० साली मिळालेला टिळक पुरस्कार. १९८६ ते १९८९ च्या दरम्यान इंडियन एयरलाइन्सचे अध्यक्षपदही राहुल बजाज यांनी भूषविलेले आहे. तसेच २००३ ते २००६ दरम्यान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेचे बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले आहे. जिनेव्हा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय व्यापार परिषदेचे अध्यक्ष व सदस्य राहण्यासोबतच हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या सल्लागार मंडळाचे ते सदस्य आहेत.

बजाज समुहाच्या उत्कर्षामध्ये राहुल बजाज यांचा सिंहाचा वाटा आहे. आजही सामाजिक जाणिवेतून सुरु करण्यात आलेल्या जमनालाल बजाज फाऊंडेशन आणि शिक्षण संस्थेद्वारा भारतीय युवा शक्ती ट्रस्ट आणि पुणे येथील रुबी हॉल क्लिानिक चालविले जाते.

राहुल बजाज यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..