नवीन लेखन...

रेल्वे बांधणीचा परामर्श

जिद्द, नियोजन, सर्व पातळ्यांवरची तत्परता, दर्जाबाबत तडजोडीला संपूर्ण फाटा, असा तोल साधत, १८५३ सालात सुरू झालेल्या भारतीय रेल्वेनं पहिल्या, पंचवीस वर्षांत ६,५४१ मैल मार्ग पूर्ण केले. त्यानंतरच्या पंचवीस वर्षांत, म्हणजे रेल्वेबांधणीला पन्नास वर्षं होता होता २३,६२७ मैल रेल्वेमार्ग पूर्ण करत ही संख्या जवळपास चौपटीच्या आसपास आणून ठेवली. रेल्वेला ६० वर्षं होता होता, १९१३ च्या सुमाराला व्हिक्टोरिया टर्मिनस (VT) आणि आताचं छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) पासून पेशावर, कलकत्ता, मद्रास, कोचिनपर्यंत गाड्या धावू लागल्या. हिंदूंचं बनारस, मुघलांचं लाहोर, ब्रिटिशांचं बंगलोर, अशा विविध धार्मिक आणि सांस्कृतिक भागांतून ह्या गाड्या जात असत. या सर्व गाड्यांचे प्रवास भारतभर पसरलेल्या ५ लाख खेड्यांजवळून घडत होते आणि भारतीय मनं रेल्वेच्या अस्तित्वामुळे भारावली होती.

आज भारतीय रेल्वे भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. केवळ रेल्वेमुळेच इथल्या दऱ्याखोऱ्यांचं, विविधतेनं नटलेल्या सौंदर्याचं दर्शन प्रत्येकाला सुखाचं आणि सुलभ झालं आहे. रेल्वेच्या इतिहासाकडे वळून बघताना, ब्रिटिशांनी सातासमुद्रापार येत भारतामध्ये ज्या प्रकारे रेल्वे बांधली ते सारे व्याप अवाढव्य व विस्मयकारकच आहेत हे जाणवत राहतं. दूरदृष्टीच्या धोरणी ब्रिटिशांनी भारतभर रेल्वेची संपूर्ण बांधणी सफलतेने व्हावी म्हणून अनेक संस्थाशी करार केले. ह्या बांधणीत ब्रिटिश ठेकेदार जास्त प्रमाणात होते, पण जमशेटजी दोराबजी, मोहम्मद सुलतान, असे भारतीयही सहभागी होते. १८५९ ते १९०० या वर्षांमध्ये या बांधणीत सहभागी झालेल्या कामगारांची संख्यादेखील सुमारे १,८०,६०१ ते २,२१,२५३ इतकी अफाट होती. या कामगारांना दिला जाणारा कामाचा मोबदला तुटपुंजा होता, जीवन कष्टमय होतं, भवितव्यात त्यांना बरे दिवस येण्याची सुतराम शक्यताही नव्हती; तरीही, रेल्वेबांधणीचं काम मात्र अहोरात्र सुरूच होतं. संपूर्ण भारतात १८५३ ते १९०० ह्या ४७ वर्षांच्या काळात एकूण ८० लाख लोक रेल्वे बांधणीच्या कामात गुंतले होते. हे खरंच अफाट व विस्मयजनक आहे. रेल्वेबांधणी देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेणं हेच ब्रिटिशांचं ध्येय होतं, त्या एकाच विचारानं ते पछाडलेले होते आणि हे अपूर्व उद्दिष्ट त्यांनी अखेर यशस्वीही केलं.

 कामाचे काही तक्ते
मद्रास रेल्वे (कोची) : वर्ष १८५७

सेवेतील कामगार संख्या एकूण खर्च माती काम क्युबिक यार्ड विटांचे काम क्यूबिक यार्ड
६,४७,५९६ २३,७६,६३१ ७,५५,३५४ ९,०,०३९

बोर (खंडाळा) व (कसारा) थळ घाट

इ.स. अंतर (मैल) सेवेतील कामगार संख्या
१८५६ १६ मैल १०,०००
१८५६ १० मैल ५,०००

निवडक मोठे पूल

पूल नदीचे नाव बांधणीचा काळ कामगार संख्या
इंप्रेस सतलज १८७३-१८७८ ५००० पेक्षा जास्त
डुफरेन गोमगेस १८८१-१८८६ ७०००
शेर-शहा चिनाब १८८०-१८९० ५०००
बेजवाडा कृष्णा १८९०-१८९३6६ ६०००
Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..