रेल्वेचा इतिहास, रेल्वेचा प्रवास, या प्रवासात भेटलेली वेगवेगळी स्टेशन्स, या गोष्टी रेल्वेप्रेमींच्या आयुष्यातली जागा ‘सुंदर आठवणी’ म्हणून आपसुक व्यापून राहतात. या प्रवासादरम्यान, देशभर, अगदी कानाकोपऱ्यांत पसरलेल्या, रेल्वेच्या महाकाय जाळ्यामागच्या व्यवस्थेविषयीचं कुतूहलही मनात नकळत जागं होतं.
रेल्वेची गाडी व्यवस्थित चालण्याकरता लाखो हात अहोरात्र राबत असतात. या रेल्वेव्यवस्थेत स्टेशन मास्तरपासून गार्डपर्यंत, गँगमनपासून टी.सी.पर्यंत, उद्घोषकांपासून सिग्नलतंत्रज्ञांपर्यंत प्रत्येकाचीच भूमिका वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाची असते. रेल्वेचे कर्मचारी नसलेले, पण खास रेल्वेवर आपला व्यवसाय अवलंबून असणारेही कितीतरी जण या प्रवासात दिसत-भेटत राहतात.
कसं चालतं या विविध भूमिकांमधल्या कर्मचाऱ्यांचं काम? या प्रत्येकाचं महत्त्व का आणि कसं अबाधित आहे? या गोष्टी समजून घेणं हीदेखील एक मजेदार बाब असते.
माहिती जमवता जमवता, ठिकठिकाणी फिरून अभ्यास करताना मला रेल्वेची मंडळी जी दिसली ती अशी होती-
- स्टेशनमास्तर
- रेल्वेचा गार्ड
- रेल्वेयार्ड व तेथील कर्मचारी
- उद्घोषक (अनाउन्सर)
- रेल्वे गँगमन अर्थात रेल्वे ट्रॅकमन
- तिकीट तपासनीस (तिकीट चेकर)
- रेल्वे-कर्मचारी
- रेल्वे आणि मुंबईचा डबेवाला
- रेल्वेमधील फेरीवाले
- लाल डगलेवाला रेल्वेहमाल
- रेल्वे प्लॅटफॉर्मवरील निराधार मुलं
- रेल्वेमधील खानपान व्यवस्था (पॅट्री कार)
- रेल्वेच्या डब्यांतील स्वच्छतागृहं
- रेल्वे आणि मालवाहतूक
- मार्शलींग यार्ड
-डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply