नवीन लेखन...

रेल्वेसिग्नल्स

रेल्वेप्रवास विनाअपघात सुरू राहण्यात सिग्नलची व्यवस्था अपरिहार्य असते.

जेव्हा इ.स. १८०६ च्या सुमारास दगडीखाणी असलेल्या जागांजवळ घोडे व गाढवे यांच्याद्वारा ओढून नेल्या जाणाऱ्या मालगाड्या प्रथम वापरण्यास सुरुवात झाली, तेव्हा रखवालदार रेल्वेलाईनवर उभं राहून हातानं सिग्नल दाखवीत. अशा वेळी काळोखामध्ये मिणमिणत्या कंदिलांचा उपयोग केला जात असे.

जगातील पहिली इंजिन लावलेली प्रवासी गाडी डार्लिंग्टन ते स्टॉकटोन या अंतरात जेव्हा प्रथम धावली, त्यावेळी त्या मार्गावर रेल्वेसिग्नलस् नव्हते. घोड्यावर आरूढ झालेल्या पोलिसांनी गाडीपुढे धावत मार्ग मोकळा करून दिला होता. हळूहळू ठरावीक अंतरावर ऐटबाज पोलीस उभे राहून मार्ग खुला ठेवीत. पुढे खांबावर फिरणाऱ्या हाताच्या आकाराच्या विविध रंगांच्या चकत्यांचा वापर करून सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात आली. रात्रीच्या वेळी स्टेशनवर मेणबत्तीच्या उजेडात गाडीला मोकळा मार्ग दाखविला जात असे.

जसजशी गाड्यांची संख्या वाढू लागली, तसतशी सुरक्षिततेची गरज अधिकाधिक जाणवू लागली. गाड्यांचा वेग वाढला. त्यातून आंतरबद्ध प्रणालीमुळे (इंटरलॉकिंग सिस्टीममुळे) एका वेळी एकच गाडी जात असे. याकरता जाड वायरने सांधे हलविले जात. हे काम पाँईंटमन करीत. पुढील काळात स्टेशन येण्याच्या आधी व नंतर उंचावर केबिन बांधण्यात आल्या. या जागेवरून पाँईंटमन प्रचंड मोठा लोखंडी दांडा हातानं हलवून सांधे बदलू लागले व गाडीला झेंडा दाखविण्याचं काम केबिनमन करू लागले.

दोन स्टेशनांमधील संवाद वायरलेसनं साधता येऊ लागल्यावर, पुढच्या स्टेशनची परवानगी असल्याशिवाय आधीच्या स्टेशनातून गाडी पुढे सोडलीच जात नसे.

जिथे एकेरी मार्ग होता त्या स्टेशनवर इंजिन ड्रायव्हरला ‘नील्स बॉल टोकन’ मिळत असे. या टोकनमधून पुढील मार्गांची संपूर्ण माहिती दिली जात असे.

यानंतरच्या काळात तांबडा, पिवळा व हिरवा ह्या तीन मुख्य रंगांचे प्रखर उजेड असलेले सिग्नल्स सुरू झाले. तांबड्या रंगाचा सिग्नल म्हणजे पूर्णपणे थांबणे, पिवळा रंग म्हणजे गाडी सावकाश, खबरदारी घेत हळूहळू पुढे नेणे; तर हिरव्या रंगाचा सिग्नल म्हणजे गाडी सुखरूप पुढे जाण्यास परवानगी आहे अशी ही सिग्नल्सच्या रंगांची आजही सुरू असलेली गृहीतकं तेव्हाही प्रचलित होती.

सिग्नल्सचं संपूर्णपणे विद्युतीकरण झाल्यामुळे आणि पूर्णतः स्वयंचलित यंत्रणा असणारे सिग्नल्स सुरू झाल्यामुळे मात्र खरी क्रांती झाली. गाडीचा पहिला डबा सिग्नल ओलांडून गेल्यावर लागलीच तांबडा दिवा लागतो. (Track Circuiting). केबिनमधील ‘सेंट्रल कंट्रोल पॅनल’वर जाणाऱ्या व येणाऱ्या या सर्व गाड्या छोट्या दिव्यांच्या स्वरूपांत दिसतात. एखाद्या गाडीने चुकीमुळे लाल सिग्नल ओलांडला तर ड्रायव्हरला धोक्याची सूचना मिळते; परंतु तरीही गाडी थांबविली नाही, तर मात्र गाडीला ब्रेक लागत ती हळूहळू थांबते. या यंत्रणेमुळे गाडीची सुरक्षितता जवळजवळ शंभर टक्के नक्की झाली आहे.

मुख्य शहराच्या बाहेर गेल्यावर, रेल्वेमार्गाची संपूर्ण जबाबदारी मधल्या, स्टेशन्सवरील स्टेशनमास्तर, केबिनमन, त्याचा मदतनीस पाँईंटमन यांच्यावर असते. रात्रीच्या वेळी केबिनमन केबिनच्या खिडकीतून हिरवा किंवा लाल प्रखर दिवा दाखवितो.

-डॉ. अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..