नवीन लेखन...

रेल्वेस्टेशन्स आणि प्लॅटफॉर्म्सची बांधणी

जगातलं सर्वांत मोठं रेल्वेस्टेशन इटलीतल्या मिलान इथे १०३ एकरांच्या भल्याथोरल्या परिसरात पसरलेलं आहे
जगातलं सर्वांत मोठं रेल्वेस्टेशन इटलीतल्या मिलान इथे १०३ एकरांच्या भल्याथोरल्या परिसरात पसरलेलं आहे

जगण्याचा अविभाज्य भाग बनलेल्या रेल्वेच्या विस्तारासाठी, रेल्वेवाहतुकीसाठी रेल्वेमार्गाबरोबरच रेल्वेस्थानकं आणि प्लॅटफॉर्म्स यांच्या बांधणीचीही निकड होती. मोठमोठ्या परिसरांत देखण्या रूपात बांधल्या गेलेल्या अनेक स्थानकांच्या वास्तू आणि प्लॅटफॉर्म्स मोठे कुतूहलजनक आणि मनात गौरवाची भावना जागी व्हावी असे आहेत.

भारतात अतिलहान, छोटी, मोठी, तशीच भव्य स्टेशनं मिळून एकंदर ८२०० ते ८५०० इतकी स्टेशनं आहेत. ही स्टेशनं बांधली गेली आणि या संख्येइतकी ‘स्टेशनवाली’ गावं रेल्वेच्या नकाशावर व लोकांच्या डोळ्यांसमोर चमकू लागली.

विस्तार बघून आश्चर्य वाटेल असं जगातलं सर्वांत मोठं रेल्वेस्टेशन इटलीतल्या मिलान इथे आहे. १०३ एकरांच्या भल्याथोरल्या परिसरात ते पसरलेलं आहे;

भारतातलं सर्वांत मोठ स्थानक कलकत्त्यात ८० एकर परिसरात हावडा रेल्वेस्टेशन’ नावानं बनलेलं आहे. इथे १६ ते १८ प्लॅटफॉर्म्स आहेत. या स्टेशनच्या बाहेर हातगाडी, घोडागाडी, बैलगाडी, ऑटो, टॅक्सी, लॉरी, बसेस आणि ट्राम्स इतकी विविध त-हेची वाहनं उभी असतात. स्टेशनबाहेरच्या जागेत वाहनांची इतकी विविधता एकाच ठिकाणी दृष्टीला पडणारं हे जगातलं एकमेव रेल्वेस्थानक आहे.

भारतातलं सर्वांत मोठ स्थानक कलकत्त्यातील हावडा रेल्वेस्टेशन

कलकत्ता शहराच्या मध्यात असलेलं सियालडा हे भारतातलं दुसरं भव्य स्थानक. उत्कृष्ट बांधकाम आणि स्थापत्यशास्त्राकरता या स्थानकाची प्रसिद्धी आहे. येथील १०० फूट लांबीचा २८ फूट रुंद आणि ६ मार्ग असलेला संपूर्ण प्लॅटफॉर्म विभाग पत्र्याच्या शेडने आच्छादित केलेला आहे. आतील बाजूला हवा खेळती ठेवण्याची व्यवस्था, भरपूर उजेड येण्याची सोय आणि पावसाचं पाणी वाहून जाण्याची उत्तम यंत्रणा, असं सोयींनी परिपूर्ण असलेलं हे स्थानक आहे.

१९३० सालात बांधलेल्या पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्टेशनमधला हॉल ७० फूट उंचीचा आहे. स्टेशनात उजेड येण्याकरता १० मजली उंच खिडक्या ठेवण्यात आल्या आहेत. या खिडक्या पार छतापर्यंत भिडलेल्या आहेत.

कलका सिमला रेल्वेमार्गावरील हुरसुंग स्टेशन हेही खास उतरत्या छपरामुळे आठवणीत राहणारं स्टेशन आहे. हे छप्पर आल्प्स पर्वतरागांमधल्या छोट्या इमारतींची आठवण करून देतं.

लखनौ हे अत्यंत आकर्षक स्टेशन आहे. या स्टेशनचे घुमट आणि मनोरे पाहताना संस्थानिकांच्या व नवाबांच्या महालांची आठवण होते.

लखनौ स्टेशन हेही एक असंच अत्यंत आकर्षक असलेलं स्टेशन आहे. या स्टेशनचे घुमट आणि मनोरे पाहताना संस्थानिकांच्या व नवाबांच्या महालांची आठवण होते. मोगल राजवाड्यांप्रमाणे मोहक कमानी, भव्य व्हरांडे आणि संपूर्ण बांधकाम लालचुटूक विटांचं, ही या स्टेशनची खासियत आहे.

वैशिष्ट्यपूर्ण बांधकामामुळे नजरेत भरणारी रेल्वेची स्थानकं (स्टेशन्स) ही जशी भारतीय रेल्वेची खासियत आहे, तसेच लांबच लांब प्लॅटफॉर्म्स हे पण वैशिष्ट्य आहे. संपूर्ण जगात सर्वाधिक लांबीचे प्लॅटफॉर्म म्हणून ७ प्लॅटफॉर्मेचा उल्लेख केला जातो. त्यांपैकी ५ प्लॅटफॉर्मस भारतात आहेत.

रेल्वेने प्रवास करून इच्छित स्थळी पोहोचता-पोहोचता सर्वच प्रवाशांनी ‘देखणे प्लॅटफॉर्म्स आणि आकर्षक स्थानकां’ची बांधणीही जरा उत्सुकतेनं न्याहाळायला हवी. विविधता आणि सौंदर्य दोन्हींचा संगम सहज दृष्टीस पडेल.

भारतातील सर्वांत लांबीचे रेल्वे प्लॅटफॉर्म्स

१. गोरखपूर (उत्तर प्रदेश)-१३६६ मीटर
२. कोलम जंक्शन (केरळ) – ११८० मीटर
३. खडकपूर (बंगाल) – १०७२ मीटर
४. बिलासपूर (छत्तीसगड) – ८०२ मीटर
५. झाशी (उत्तर प्रदेश) – ७७० मीटर
६. सोनपूर (बिहार) – ७३८ मीटर

 

भारतात अतिलहान, छोटी, मोठी, तशीच भव्य स्टेशनं मिळून एकंदर ८२०० ते ८५०० इतकी स्टेशनं आहेत. ही स्टेशनं बांधली गेली आणि या संख्येइतकी ‘स्टेशनवाली’ गावं रेल्वेच्या नकाशावर व लोकांच्या डोळ्यांसमोर चमकू लागली.

-डॉ. अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

1 Comment on रेल्वेस्टेशन्स आणि प्लॅटफॉर्म्सची बांधणी

  1. Very informative and interesting! Proud to know about Indian Railways standing in railways and it’s station in the world ranking.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..