आला ! आला रे पाऊस !
धरणीला मीलनाची आंस //धृ//
गेली होती तापूनी रखरखली सारी,
अंग जाता वाळूनी भेगा पडती शरीरी ।।
थकली ती सोसूनी उकाड्याचे चार मास
आला ! आला रे पाऊस !
धरणीला असे मीलनाची आंस ।।१।।
पाणी गेले आटूनी नदी नाले कोरडे,
पहाटेच्या दवातूनी झाडे जगती थोडे ।।
गेली हरळी जळूनी बीजे टाकूनी आसपास
आला ! आला रे पाऊस !
धरणीला मीलनाची आंस ।।२।।
आता येईल वनीं चैतन्य लपलेले,
तरुवेली जाती फुलूनी पडणाऱ्या जलामुळे ।।
जाती सारे आनंदुनी दरवळत मातीचा सुवास,
आला ! आला रे पाऊस !
धरणीला असे मीलनाची आंस ।।३।।
— डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply