नवीन लेखन...

भूजल साठे का व कसे?

वर्षातले ४० ते ४५ दिवस पाऊस पडतो. ते पाणी बाकीच्या ३२५ दिवसांत काटकसरीने सर्व प्रकारच्या कामासाठी वापरावे लागते, म्हणून जलसाठे करणे भाग पडते.

इतर प्रकारच्या जलसाठ्यांच्या तुलनेत भूजलसाठे दूषित व्हायची शक्यता कमी असते. भूजलात साठवलेले पाणी बाष्पीभवनाने वाया जात नाही. कमीत कमी खर्चात भूजल साठवणे शक्य आहे. पृथ्वीच्या पोटात पाणी कसे खेळते ते दिसत नाही. जे दिसत नाही त्याविषयी तर्कवितर्क लढवले जातात आणि त्यातून बऱ्याच अंधश्रद्धा निर्माण होतात.

जमिनीतले पाणी सांगणारे ठग जगाच्या पाठीवर सर्वत्र विखुरलेले आहेत. छतावरचे पाणी जमिनीत मुरवणे, विहिरीद्वारे पाणी जमिनीत भरणे हा असाच शहाण्या माणसांचा गाढवपणा आहे. पुनर्भरणावर मोहिमा राबवल्या जातात, कायदे केले जातात. आंधळ्या कोशिंबिरीचे खेळ!

महाराष्ट्रातला ८२ टक्के भूभाग कठीण खडकांनी (डेक्कन ट्रॅप बेसाल्ट) व्यापलेला आहे. पश्चिम घाट आणि मुंबईजवळ या खडकांची जाडी ३००० मीटर असून नागपूरजवळच्या पूर्वेकडे ती २०० ते ३०० मीटरपर्यंत पातळ झाली आहे. जमिनीपासून खोली वाढेल तसे सच्छिद्रतेचे प्रमाण घटते. साधारणपणे ३० मीटरपेक्षा खालचे खडक एकजीव असतात. तिथे अंतर्गत प्रवाह क्वचितच असतात.

महाराष्ट्रातल्या कठीण खडकांची पाणी साठवण क्षमता १ ते ३ टक्क्यांच्या आतच आहे. त्यांची पाणी वहन क्षमता प्रतिदिन १० मीटर एवढी आहे. एकजीव खडकात पाणी लागत नाही आणि लागले तरी मिळणारा प्रवाह प्रतिसेकंदाला एक ते दोन लिटरच्या जवळपासच असतो. अर्थातच पुनर्भरण करताना अशा खडकांची पाणी ग्रहण क्षमताही प्रती सेकंद एक ते दोन लिटरएवढीच असते. म्हणून पुनर्भरण केले आणि चुटकीसरशी पाण्याचा प्रश्न सुटला, अशी परिस्थिती निदान महाराष्ट्रात तरी नाही.

जमीन हे पाणी साठवायचे आभाळाएवढे प्रचंड भांडार आहे. मशागत केलेल्या कोरड्या जमिनीच्या एक मीटर खोलीत ३५० ते ४०० मिमी पाणी साठविता येते. ते करण्याऐवजी आपण पळत्याच्या मागे धावतो.

प्रा. बापू अडकिने, परभणी
मराठी विज्ञान परिषदेच्या कुतुहल या सदरातून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..