महाराष्ट्रीय कलोपासक या नाट्यसंस्थेमार्फत १९६३ सालापासून आयोजल्या जाणाऱ्या पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन नाट्य स्पर्धेच्या घडणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
राजाभाऊ नातू म्हणजे ‘कलोपासक’चे चिटणीस आणि पुरुषोत्तम स्पर्धेचे सर्वेसर्वा. एक उत्तम दिग्दर्शक आणि नेपथ्यकार असा त्यांचा लौकिक होता. पुरुषोत्तम करंडक’ ही आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा घेणा-या ‘महाराष्ट्र कलोपासक’ या संस्थेची स्थापना पुण्याच्या नाटकवेडया मित्रांनी ८० वर्षापूर्वी केली. या स्थापनेत आघाडीवर होते पुरुषोत्तम रामचंद्र ऊर्फ आप्पासाहेब वझे, भगवान पंडित व प्रभुदास भूपटकर. ही स्पर्धा आकारास येत असतानाच १९६२ साली आप्पासाहेब वझे यांचे निधन झाले. त्यांच्या प्रति असलेली कृतज्ञतेची भावना स्मरणात राहावी म्हणून संस्थेचे तत्कालीन चिटणीस चिंतामण मोरेश्वर तथा राजाभाऊ नातू यांनी कै. पुरुषोत्तम रामचंद्र उर्फ आप्पासाहेब वझे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा’ आयोजित केली जावी, ही कल्पना मांडली. त्या कल्पनेला आकार आला आणि गेले ५५ वर्ष पुण्यातील महाविद्यालयीन तरुणाईच्या मनात आपली हक्काची प्रतिष्ठा कमावली.
राजाभाऊ नातू यांचे १ जुलै १९९४ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply