“नरेंद्रजीं“चे धरून बोट
“देवेंद्रजी” पळत आहेत
“घड्याळ्या“च्या काट्यांना
ते अधूनमधून लोंबकळत आहेत
विझली “गांधी” नामाची आँधी
उरली थोडी ज”रा हूल” आहे
अखिलत्व गमावलेल्या पक्षास
“अखिलेशी” यशाची भूल आहे
सन्मान बहु पडला पदरात
बारा मती ची ही करामत आहे
कोणत्याही सत्ता-ऋतूत
“शरद” ऋतु ऐन भरात आहे
मज तुजसवे घेऊन टाक रे
अन् मतदारां पुढे उभा “ठाक रे”
धाकट्याची ही टाळी टाळून
मोठा म्हणे तू असाच वाक रे
मंत्रीपदाच्या खुर्चीत
कवी-राम रममाण आहे
कमळाच्या कर्जात आता
सा”री पब्लीक” गहाण आहे
मतमतांच्या या गलबल्यात
जनतेस हे कळले आहे
आळीपाळीने या साऱ्यांनी
लोकशाहीस छळले आहे
—— कवी कोण आहे माहिती नाही
Leave a Reply