नवीन लेखन...

राजसाहेब, माफ़ करा, पण…..

राजसाहेब, माफ़ करा, पण…..
———-लेखक: जयेश मेस्त्री.

माननीय राजसाहेब ठाकरेजी, तुम्ही मला ओळखत नसाल पण मी तुम्हाला ओळखतो. तुम्हाला कोण नाही ओळखत? मी आपल्याच महाराष्ट्रातला एक सर्वसामान्य नागरिक आहे. म्हणजे तुमचे फ़ोटो मोबाईलच्या वॉलपेपरवर ठेवणारा, कामाला दांडी मारुन तुमचे भाषण ऎकायला येणारा, टी.व्ही मध्ये जर तुमची मुलाखात असेल तर सगळी कामं बाजूला ठेऊन ते पाहणारा, तुमच्या चळवळींना (अहिंसक मार्गाने) पाठींबा देणारा आणि मतदानाच्या वेळी तुम्हाला मत देणारा, मी एक सर्वसामान्य मराठी हिंदु नागरिक आहे.
साहेब, तुम्ही जसे दिग्गज राजकिय नेते आहात तसेच मोठे कलाकारही आहात. तुमची व्यंगचित्रे मी पाहिली आहेत. ती पाहिली की कुणीही सुजाण माणूस तुमच्या प्रेमात पडेल. साहेब तुम्ही खूप दिग्गज कलाकार आहात आणि तुम्ही सतत इतर कलाकारांना मदत करीत असता. तुम्हाला सर्व कलाकारांबद्दल प्रेम व आपुलकी आहे. कदाचित यामुळेच तुम्ही एम. एफ़. हुसेन वारले तेव्हा दिलगीरी व्यक्त केली. यावरुनच तुमचा मोठेपणा दिसून येतो.
हुसेनने आपल्या हिंदू देवतांचे नग्न नि अश्लिल चित्रे काढली. “रेप ऑफ़ इंडीया” या चित्रात हुसेनने भारतमातेचे विकृत चित्र काढलं. त्यांच्यामते भारत एक बलात्कृत देश आहे का? हा देशद्रोह नाही का? हा चित्रकार हिंदु देवतांना नग्न दाखवतो. रावणाच्या मांडीवर बसलेली नग्न सीता अशी किती तरी घाणेरडी चित्र आहेत. काही (अति)बुद्धिवादी लोक म्हणतात की ही क्रिएटीवीटी आहे किंवा फ़्रिडम ऑफ़ एस्क्प्रेशन आहे. तर मग हुसेनने फ़ातिमाचे चित्र काढलं आहे ते संपूर्ण कपड्यात आहे, त्याची आईचं, बहीणीचं, मदर टेरेसा, या सगळ्यांच्या चित्रात कपडे घातलेले आहेत. ह्यांचं चित्र काढताना हुसेनला क्रिएटीवीटी किंवा फ़्रि

डम ऑफ़ एस्क्प्रेशन सुचत नाही का? केवळ हिंदु देवतांची चित्रे काढाताना ही क्रिएटीवीटी जागी होते? हुसेन आपल्या एका मुलाखतीत म्हणाला होता की मी हिटलरचा द्वेश करतो म्हणून त्याचं चित्र मी नग्न काढलं आहे. ह्याचा अर्थ ज्या कुणाचा हा थेरडा द्वेश करायचा त्याचं चित्र नग्न काढायचा. हुसेन हिंदु देवतांचा तिरस्कार करायचा म्हणून त्यांचे चित्र नग्न काढायचा. साहेब तुम्ही म्हणालात की हुसेनचे प्रेत पंढरपुरात आणून अंत्यसंस्कार करावा. पण ह्याची काय गरज आहे साहेब? तो कतारचा नागरिक झाला तेव्हाच तो भारताला परका झाला. त्याने हिंदुंच्या भावना दुखावल्या. पण हिंदुंनी त्याला मारले नाही किंवा त्याच्या जातीच्या लोकांना त्रास दिला नाही. साहेब पंढरपुर हे विठ्ठलाचं स्थान. वा‌रक‍र्‍यांचं स्थान. तिथे पहिला हक्क वारकर्‍यांचा. हुसेनला पंढरपूरात दफ़न करण्यासाठी वारकर्‍यांची परवानगी घ्यावी लागेल. ते होय म्हणणार नाहीत, पण जर ते होय म्हणाले तर मग नंतर तिथे त्याची समाधी होऊ देऊ नका. जर असे झाले तर काही दिवसांनी लोक तिथे नवस करायला येतील. नवसाला पावणारा पेंटर बाबा किंवा हुसेन बाबा अशी त्याची ख्याती होईल. अहो साहेब तुम्हाला तर माहीतंच असेल की प्रतापगडावर अफ़झलखानाची पूजा होते. त्याच्या समाधीवर दररोज फ़ुलांची चादर चढवली जाते. पण महाराजांच्या पुतळ्यावर पक्षांनी केलेली घाण साफ़ करायला सुद्धा कुणाला वेळ नसतो. आजकाल अफ़झलखान नवसाला पावतोय म्हणे. ह्यांच्या घरी अफ़झखान जन्माला येणार, शिवाजी नव्हे. असो, आबांच्या भाषेत म्हणायचं तर बडे बडे शहरोमे ऎसी छोटी छोटी बाते होती रहती है.

साहेब हुसेनची मुंबईत एक ग्यालेरी बनवण्यात यावी अशी तुमची ईच्छा आहे. आता तुम्हाला कोण विरोध करणार साहेब? तुम्हाला फ़क्त इतकिच विनंती आहे की त्या ग्यालेरीत हुसेनने काढलेली हिंदूंची अश्लिल चित्रे लावू नक

ा. आम्हा हिंदूंच्या भावनांचा अनादर करु नका. माणूस मेला की त्याचं वैर पण संपतं, असं म्हणतात. पण राजसाहेब आमचं (सर्वसामान्य हिंदुत्ववादी जनतेचं) मन तुमच्या इतकं विशाल नाही. माझ्या मते हुसेन एक मानसिक रोगी होता. त्यांच्या चित्रात ते सहजंच दिसून येतं. मी चित्र या कलेचा जाणकार नाही. तुमच्या ईतका तर नाहीच नाही. पण त्याचं सुतक आम्ही का पाळावं? हुसेन मनोरुग्ण होते, त्यांच्यावर उपचार होण्याआधीच ते गेले, ह्याचं दःख मला वाटतं.
काही चूक झाली असेल तर क्षमा करा. लहान तोंडी मोठा घास घेतला. राजसाहेब माफ़ करा पण…. राहवलं नाही म्हणून बोललो.

लेखक: जयेश मेस्त्री.
ई-मेल : smartboy.mestry@gmail.com
jaysathavan@gmail.com
blog: http://akhandhindusthanmahasabha.blogspot.com
http://mazikavita-jayesh.blogspot.com/

माननीय राजसाहेब ठाकरेजी, तुम्ही मला ओळखत नसाल पण मी तुम्हाला ओळखतो. तुम्हाला कोण नाही ओळखत? मी आपल्याच महाराष्ट्रातला एक सर्वसामान्य नागरिक आहे. म्हणजे तुमचे फ़ोटो मोबाईलच्या वॉलपेपरवर ठेवणारा, कामाला दांडी मारुन तुमचे भाषण ऎकायला येणारा, टी.व्ही मध्ये जर तुमची मुलाखात असेल तर सगळी कामं बाजूला ठेऊन ते पाहणारा, तुमच्या चळवळींना (अहिंसक मार्गाने) पाठींबा देणारा आणि मतदानाच्या वेळी तुम्हाला मत देणारा, मी एक सर्वसामान्य मराठी हिंदु नागरिक आहे.

— जयेश मेस्त्री

Avatar
About जयेश शत्रुघ्न मेस्त्री 12 Articles
हिंदूत्त्व या विषयावर परखडपणे लिहिणारे श्री जयेश मेस्त्री हे व्यवसायाने विमा (एल. आय. सी )आणि गुंतवणूक एजंट आहेत. ते हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..