श्रावण महिन्यांत पौर्णिमेचे दिवशी रक्षाबंधन नावाचा विधी करतात. पूर्वी आतासारखा हा सण नव्हता. पूर्वी तांदूळ, सोने व पांढऱ्या मोहऱ्या एकत्र करून त्यांची पुरचुंडी बांधून रक्षा अर्थात राखी तयार करीत. ती राखी मंत्र्याने राजाला बांधावी असे सांगितले आहे. असाच विधी भविष्य पुराणातही सांगितला आहे.
इतिहास कालापासून याची नूतन प्रथा सुरु झाली. या काळात बहीण भावाला राखी बांधू लागली. यामुळे भावाचा उत्कर्ष व्हावा व बहिणीचे संरक्षण करावे अशी भूमिका झाली. इतिहासातील उदाहरण म्हणजे उदेपूरची राणी कर्मवती हिने हुमायूनाला भाऊ मानून राखी बांधली होतीं.
सांप्रत सर्वत्र राखी बांधण्याची – पाठवण्याची प्रथा सुरु आहे. या राख्यांमध्ये सुध्दा अनेक नमुने येत आहेत. या सणामुळे भावाबहिणीचे प्रेम घनिष्ठ होते व समाजात भ्रातृभाव निर्माण होतो.
जैन समाजात हा दिवस रक्षापर्व म्हणून पाळतात. या दिवशी जैन मंदिरात राख्या ठेवलेल्या असतात.
Leave a Reply