रमेश गणेश देशपांडे (१९३४-१९९४) यांनी पुणे विद्यापीठातून एमएस्सी केले. लगेच ते मुंबईच्या भाभा अणू संशोधन केंद्रात (BARC) समस्थानिक (Isotope) विभागात रुजू झाले. बीएआरसी तेव्हा नुकतेच सुरू होत होते. आणि अशा प्रकारच्या प्रकल्पात कोणतीही परदेशी तांत्रिक मदत मिळत नसल्याने प्रत्येक शास्त्रज्ञाला अगदी मुलभूत काम करून उपकरणे बनवायला लागत व आपले नेहमीचेही करावे काम लागे.
समस्थानिक विभागाचे प्रमुख म्हणून ते रुजू झाले, मग संचालक व शेवटी बोर्ड ऑफ रेडिएशन अँड आयसोटोप टेक्नॉलॉजीचे (ब्रिट) मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. १९५६ साली बीएआरसीमधील ‘अप्सरा’ ही पहिली अणुभट्टी सुरू झाली. त्याद्वारे किरणोत्सारी समस्थानिकांचे उत्पादन सुरू झाले. आता ब्रिटचा विस्तार भारतात अनेक ठिकाणी व परदेशातही झाला आहे, यामागे श्री. देशपांडे यांचे अथक प्रयत्न कारणीभूत आहेत. किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग वैद्यक आणि कृषीशास्त्रात होतो. यासाठी प्रथम ‘अप्सरा’, मग ‘सायरस’ आणि ‘ध्रुव’ या अणुभट्ट्यांनी काम केले. अणुवीज केंद्रातही कोबाल्ट- ६० आणि टिशीयम ही उत्पादने करता येतात. वैद्यकीय साधने वेष्टणात बंद केल्यानंतर गॅमा किरणांद्वारे त्यांना निर्जंतुक करण्यात येते.
तंत्रामुळे दुर्गम प्रदेशातील सैनिकांसाठी वैद्यकीय साहित्य व उपकरणे पुरवणे शक्य न झाले. प्लास्टिकचा वापर केलेली इंजेक्शन आणि सिरिंजेससारखी उपकरणे वापरून फेकून देता येत असल्याने त्यांच्या अडचणीच्या ठिकाणी परत परत निर्जंतुकीकरण करणे टाळता आले. या समस्थानिकांच्या उत्पादनामुळे बीएआरसीच्या उत्पन्नात भरीव वाढ झाली. अमेरिकेत निर्यात होणारे हापूसचे आंबे जास्त काळ टिकावेत यासाठी. ते नाशिकजवळच्या लासलगावला गॅमा किरणांच्या सहाय्याने निर्जंतुक करण्यात येतात. याच पध्दतीने कांदे, बटाटे, कडधान्ये, डाळी यांचेही आयुष्य वाढवता आले. श्री. देशपांडे यांनी एशिया पॅसिफिक प्रदेशातील अनेक देशांच्या अणू प्रकल्पातील समस्थानिक आणि विकिरण विभागांना सल्ला आणि सहकार्य दिले आहे.
Leave a Reply