सीतेकरीता व्याकुळ झाला
अवतारी चक्रपाणी,
अजब ही रामप्रभू कहाणी ।।धृ।।
पत्नीहट्ट त्याला सांगे,
कांचनमृग शोभेल अंगे,
मृगयेच्या तो गेला मागे
प्रसंग घेई रावण साधूनी ।।१।।
अजब ही रामप्रभू कहाणी
रावण नेई पळवूनी सीता
दिसेना रामा कोठे आता
तरुवेलींना पुसत होता
वाहत होते अश्रू नयनीं ।।२।।
अजब ही रामप्रभू कहाणी
वाणी ज्याच्या शक्ती शिवाची
ह्रदयामाजी दया सागराची
त्यालाही दिसे नियती खेची
सामान्यतेच्या मापी तोलूनी ।।३।।
अजब ही रामप्रभू कहाणी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply