रणबीर कपूर हा हिंदी चित्रपटसुष्ट्रीतील नव्या पिढीचा कलाकार म्हणून ओळखला जातो. त्यांचा जन्म २८ सप्टेंबर १९८२ रोजी झाला. रणबीरचे शिक्षण माहीमच्या बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्याने उच्च शिक्षणासाठी अमेरिका गाठले आणि न्यू यॉर्कच्या ‘लि स्ट्रॅसबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूट’मध्ये अभिनयाचे धडे गिरवले. २००७ मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या ‘साँवरीया’ चित्रपटात सर्वप्रथम भूमिका केली. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाची तारीफही झाली आणि त्याला पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
२००९ मध्ये ‘वेक अप सिड’ आणि ‘अजब प्रेम की गजब कहाणी’ या चित्रपटांसाठी त्याने समीक्षकांचा सर्वोत्तम अभिनयासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. रणबीरने आतापर्यंत पाचवेळा फिल्मफेअर अवॉर्ड मिळवले आहे. सावरियाँ, बचना ऐ हसीनो, रॉकेट सिंग, वेक अप सिड, रॉकस्टार, राजनीती, बर्फी असे अनेक हिट चित्रपट त्याने दिले. केवळ अभिनेते ऋषी कपूर आणि अभिनेत्री नीतू सिंग यांचा वारसदार आणि राज कपूर यांचा नातू म्हणून न वावरता रणबीर कपूरने बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच आघाडी घेत आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केलाय.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply