नवीन लेखन...

रंग बदलणारं झाड – करू

रंग बदलण्याची गोष्ट  निघाली  तर सरड्याचे नाव पहीले घेतले जाते  मात्र  नागपूर जिल्ह्यातील  वैनगंगा नदीकाठच्या आभोरा जंगलातील खोलेश्वर(कोलेश्वर) पहाडावर एक असं झाड पाहावयास मिळतं की ते बदलत्या रूतूनुसार आपला रंग बदलतं. ह्या जादूई वृक्षास परीसरात करू चे झाड म्हणून ओळखल्या जाते.
हा वृक्ष गर्मी च्या मौसम मध्ये म्हणजे उन्हाळ्यात  सफेद पांढरा , पावसाळ्यात  गुलाबी व सर्दी चा मौसम हिवाळ्यात  हिरवा होत जातो. सध्या हिवाळा लागल्याने त्याचा रंगबदल सुरू आहे. ह्या  संदर्भात  वनविभाग अनभीद्न आहे   मात्र  अशी अनेक झाडे  वेलतूर व आभोरा डोगंरात असल्याची माहीती जानकार देत आहेत. भंडारा- गोदीया जिल्हा तील  नागझीरा अभयारण्यात अशी काही झाडे असल्याची माहीती आभोरा फाऊंडेशन ने ऐका अभ्यासदौरयातून मिळवीली आहे.
वेलतूर व परिसरातील जंगलात अशी  अनेक  वृक्ष  आहेत जे आपली खास व  विशेष ओळख  राखुन आहेत. वैैनगंगा नदीघाटावर अनेक दुर्लभ वनस्पती  व वेली मोठ्या प्रमाणात आहेत. ज्यामध्येे मोठ्या प्रमाणात औषधीय गुण आहेत . यात लाच  हा एक महत्वाचा वृक्ष आहे. जो  रूतू नुसार आपला  रंग बदलत असतो  ज्याचे नाव आहे करू. यह वृक्ष वेलतूर  वनपरिक्षेत्र अंतर्गत येणारे  मेढा आभोरा परिसरात  डोगंरावर मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतो. या प्रकारची  झाडे इतर जंगलात खुप कमी प्रमाणात पाहावयास मिळतात. करू नामक ह्या  प्रजाति चे वृक्ष दुर्लभ  असल्याने त्यांची ओळख पाठविणे सर्व सामान्यांना कठीण आहे. ह्याचा अभ्यास आभोरा फाऊंडेशन चे शरद शहारे कित्येक वर्षे पासुन करत आहेत .
हा वृक्ष औषधियुक्त आहे. या वृक्षच्या चिका( गोंद )चा उपयोग कैप्सुल चे कवर तयार  करण्यास केला  जातो.  याला लागणारे  फल स्वादिष्ट असल्याने  तेे रानमेेेवा  म्हणून मोठ्या चवी ने खालल्या जाते.
याचा आकार  विशालकाय असा असल्याने याचेवर अनेक  पक्षी अपले घरटे बांधतात. या वृक्षाबाबत अदभुत गोष्ट  समोर आली ती म्हणजे त्यांचे रूतू नुसार रंग बदलने.   त्याच्या रंगबदलाने त्याला जादुगार ही म्हटले जाते.
ह्या जादूई झाडाने आता अभ्यासकाना वेड लावले आहे. जादूटोणा करणारे ह्या झाडांच्या शोधात नेहमीच फीरत असतात. ह्यांचे  संवर्धन करने आता कालाची गरज झाली आहे . ह्या  प्रकारच्या झाडाचे वृक्षारोपण करूण पर्यावरणाला संतुलित केल्या  जाऊ शकते.  इतर औषधी गुणधर्म ओलखुन वैद्यकीय उपचारासाठी वापरले जाऊ शकते त्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
— शरद शहारे
वेलतूर
मो 9579207319

1 Comment on रंग बदलणारं झाड – करू

  1. दत्तापूर (निरंजन माहूर ) ता. कळंब जिल्हा यवतमाळ (ms)445401
    येथील जंगलात करू ची झाडें आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..