प्रश्न नेहमीच सोपे असतात. अवघड असतं ते उत्तर. इतरांना द्यायच्या उत्तरापेक्षा मनाला देण्याचं उत्तर जास्त अवघड!कारण सगळचं त्यातल्या मूळ रंगछटासह स्पष्ट आपल्या मनात असतं. पण तरिही
मला माहीती आहे .तूझ्याकड़े असेलच माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर .. माझ्या मनातील रंगछटा आणी तूझ्या मनातील रंगछटानी मिळून canvas तयार झालाय. या canvas वरील प्रत्येक रंगावर मी भरभरून निखळ आणी निस्वार्थपणे प्रेम करतेय . आणी करत राहणार कारण या canvas वर मी कूठलंही प्रतिबिंब शोधत नाहीए.
शोधूच नये अरे खरंतरं कुठंलही प्रतिबिंब …पण हे मनाचे ड़ोळे खूप दृष्ट …..प्रश्नांशी सलगी करून पार छळतात आणी गालातल्या गालात हसतातही. जेंव्हा आपण संभ्रमावस्थेत असतो. मग अशावेळी खूप प्रश्नांचा गोतावळा आपल्या आजूबाजूला पसरून आपला हक्क दाखवायला लागतो. अशावेळी खूप जीव गुदमरतो.
पण मी निश्चिंत आहे अरे कारण मला माहीत्येय उत्तर देणं कठीण असलं तरी तू ते मला देशीलच . कारण तू आहेस विश्रब्ध.
— © वर्षा पतके थोटे
30-01-2019
Leave a Reply