रंग निळ्यासावळ्या घनांचा, आज आभाळी पसरला,
जसा विविधरंगी मुलामा,
नभांगणाला कुणी दिधला, —
दिनकर उगवला जसा ,
रंगांचे अगदी पेंव फुटतां,
नभी जादू -ई खेळ चालला,
जो पाहे तो चकित जाहला,–!!!
सोनेरी, पांढरट, निळा,
काळा जांभळा, पिवळा,
रंग सज्ज भास्कर-स्वागतां,
जणू विजयोत्सव साजरा,–
मित्रराज डुलत येता,
गडगडाट झाला ढगांचा,
मेघमल्हार कोणी गायला ,
कल्लोळ उठला पहा विजेचा,
सुरुवात झाली चमचमाटा,
धांदल सगळी मेघांची उडता,
सूर्यराज विराजमान झाला,—
धरती ल्यायली सोनशेला..!!!
प्रकाशाचे रांजण उधळता,–
प्रभाव सोनेरी किरणांचा,
आकाशात जसा पडला,
उन्हात न्हाली वसुंधरा,
उजेडाचा सारा पसारा,-
सीमा नाही तिच्या आनंदा,–!!!
हिमगौरी कर्वे ©
Leave a Reply