कुठून आले हे निळे पाखरू,
पाहून त्याला वाटे उल्हास, निसर्गाचा महिमा, जादू ,
ही तर रंगांची आरास,–!!!
झुलत्या फांदीवर बसतां, पुढेमागे ते बघा झुले,
देखणे वाटे, नजर फिरता,
रंग पांच त्यात मुरलेले,–!!!
इवलेसे, मुठीत मावेल,
जीव तरी केवढासा,
लकलक डोळे, छोटे शेपूट तपकिरी रंग त्याचा,–!!!
चटकन हेरे सावज,
नजर भिरभिरत बघे,
खुट्टट आवाज होता ,
बनते एकदम सावध,–!!!
पाठीवर निळा रंग पहा,
पंखांवर पांढरट पट्टे ,
आखीव रेखीव कसे ते,
आहेत कोणी चितारलेले,?–
मानेवर केशरट झालर,
त्यातून काढे चिमणे डोके,
कडेकडेने हिरवी मखमल,
डोकी पिवळा तुरा शोभे,–!!
कारागिरी पाहून उठावदार,
निसर्गा प्रणाम पुन्हा एकवार,
किती मोठा तू चित्रकार,
जाणीव ठेव मानवा थोर,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply