रंगाच्या उधळूनी लाटां, नाचल्या किती गोपिका,
आज पंचमी, रंगात नाहली,
विलक्षण गोकुळाची कळा,||
श्रीहरी नावातच हिरवा,
निळा रंग गगनाचा,
आभाळभर पसरलेला,
रंग शोभे तो निळ्या’चा,
अस्तित्त्व’ त्याचे आसमानी,
आणि सखाहरी तो धरणीचा,|| २ ||
गोपिका आज नाचल्या
टाकुनी सगळ्या बंधना
जिवाशिवांचे’ बनले ”अद्वैत””,
विसरून साऱ्या तनांमनां,
कृष्णा’सम तो कोण सवंगडी,
मिळेल त्यांना नेमका,—???
रंगवुनी टाकती, भान विसरती,
माखवुनी टाकती एकमेकां,
समर्पणा’ची ‘तऱ्हा’च न्यारी,
गोकुळीचाच, वाजे डंका,—!!!! || ४ ||
सगळ्या एकजीव, एकतान,
एकरूप एकप्राण’
एकमेव ध्येय आणि
एकच ते ‘पंचप्राण’,—-!!!
शरीरे अनेक रंग खूप,
रुपे’ — वेगळी तयांची,
आत्म्या’ मधला, एकच कान्हा,
एकच दिसे फक्त श्रीरंग,””—-!!! || ५ ||
खेळती बेधुंद’ गोपिका
जशा रमुनी गोकुळा,
तशीच भोगती सर्व,
इंद्रिये इह’– सुखां,
अतृप्त’खेळे आत्मा,
त्यात सतत सारखा,
होई देहा’चेचगोकूळ’
आत्मा’कृष्णसखा”’,!!
हिमगौरी कर्वे. ७७७ ५०८५६५७.
Leave a Reply