रंगपंचमी हा सण फाल्गुन पंचमीला साजरा करतात. या दिवशी (सध्याच्या काळात) रंग (कोणताही) अंगावर उडवितात. पिचकाऱ्या भरुन मुले रंग उडवितात.
पूर्वी राजेलोक या सणाला केशर, गुलाल वगैरे उडवत असत. केशराचे पाणी उडवणे सर्वांना शक्य नसल्याने रंग आले असावेत. या सणावेळी उष्णता वाढीस लागलेली असते. त्यामुळे केशराचे पाणी थंडाव्याच्या दृष्टीने आरोग्यकारक आहे.
विद्याधर करंदीकर
Leave a Reply