रंग चिकित्सेत या लेखात आपण हस्त नक्षत्रा बाबत माहिती घेऊ. नक्षत्रांच्या क्रमवारीत हस्त हे तेरावे नक्षत्र आहे. या नक्षत्राची देवता सूर्य सविता आहे. या नक्षत्रात पाच तारे असून त्यांचा आकार हाताच्या पंजासारखा दिसतो. या नक्षत्राचे चारही चरण कन्या राशीत येतात. कन्या रास ही शीतरंगांच्या प्रभावाखाली येते. उदयापूर्वीचा सूर्य आणि आता जवळ आलेला सूर्य ज्या स्वरूपात दिसतो, त्या रूपाला सविता असे म्हंटलेलं आहे. सविता एक स्वतंत्र देवता आहे. सविता म्हणजे प्रेरणा, उत्साह उद्दीपित करणे असे अर्थ आहेत. सायणाचार्यांनी सांगितले आहे की, सविता सोनेरी हाताचा, सोनेरी डोळ्याचा अन सोनेरी जिभेचा आहे. तो जीवमात्रांचे पापे दुःखे दूर करतो तसेच मानवाची दुःखे सोडवून आयुष्य वाढवितो. म्हणून या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींनी सकाळच्या कोवळ्या उन्हात विशेषतः पिवळ्या रंगाच्या, फिक्कट पिवळ्या वा ऑफ व्हाईट रंगाचे कपडे परिधान करून बसावे. अथ हस्ते रोग संभवे शांतिः। हा जप केल्यास अधिक उत्तम. यामुळे खरुज, नायटा, जिभेचे चरे, कान दुखी, उदर कृमी, जुनाट व्रण, कुष्ठ यासारख्या व्याधींवर या नक्षत्राचा आराध्य वृक्ष वेलीस्वरूपातील जाई- चमेली- मालती तसेच पर्यायी वृक्ष रीठा यांच्या पंचांगांचा औषधी उपयोग होतो. वरील रंगांबरोबरच हिरवा, पांढरट, तपकिरी महत्त्वाचे रंग असून चार ते पाच पाकळ्यांची फुले, मोराच्या स्वरूपात येतात त्यांचाही प्रभावी असा औषधी उपयोग होतो.
रंगहीन काचेचा ग्लास वा नारिंगी लाल रंगाच्या काचेच्या भांड्यात पाणी घेऊन ते सूर्याच्या सविता रूपच्या काळात सूर्यप्रकाशात सकाळी आणि सायंकाळी ठेवून ते प्यायल्यास या नक्षत्राच्या व्यक्तींना प्राकृतिक वैगुण्य दूर करण्यासाठी लाभ होतो. यावेळी-
सवितारहं वंदे सप्ताश्र्चरग्ध वाहनम् ।
पद्यासनस्थं छायेशं हस्त नक्षत्र देवताम् ।। आणि
हस्तस्याधिपतीः सुर्यः जगदात्मा तथैवच् ।
सर्वारिष्ट विनाशाय तस्मै नित्यं नमोनमः ।।
या मंत्र पठणाने अधिकच सकारात्मक उपयोग होतो. तसे हे नक्षत्र लक्ष्मी दायक, सत्त्वगुणी, उत्तम शरीरसौंदर्य, कला कुशलता, विद्वान तसेच विद्वानांची कदर करणारे, दागिन्यांची आणि वाहनांची आवड निर्माण करायला लावणारे, मादक पदार्थांची आवड असणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना जन्माला घालते.रीठा चे फळ दोर्यात ओवून मुलाच्या वा मुलीच्या गळ्यात बांधले त्यांना दृष्ट वा नजर लागत नाही.
पांढरा किंवा पिवळ्या रंगाच्या नारिंगी रंगाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या छटांपैकीरंगाचा विचार करून वस्त्र परिधान करून ॐ सूर्यनारायणाय नमः किंवा ॐ सवितृ सूर्यनारायणाय नमः हा जप अधिकाधिक प्रमाणात या व्यक्तींनी केल्यास अनेक ज्ञात-अज्ञात व्याधींपासून यांची मुक्तता होते.
कन्या राशी स्वामी बुध, त्यासाठी हिरव्या रंगाच्या विविध प्रकारच्या छटा, शीतरंग आणि वर उल्लेखिलेले सर्व रंग हे या व्यक्तींसाठी लाभदायक रंग आहेत. त्या जोडीला वर दिलेले जप हे त्या व्यक्तीच्या प्रगती रथाच्या इंधनाचे काम करतात.
शुभं भवतु
प्रा. गजानन शेपाळ
Leave a Reply