‘रंग चिकित्सा’ किंवा ‘रंगोपचार’ हा उपचार इतका आश्वासक आहे की संबंधिताला अनुभव हा येतोच येतो. रंगज्ञान हे प्रत्येक जीवात्म्याला असतेच. रंगज्ञानाची प्रक्रिया पाहिली तर आपल्या डोळ्यांच्या रचनेत, रेटिनाच्या आतल्या बाजूस असंख्य कोन्स आणि रॉडस असतात. दंडगोल आणि शंकूच्या आकारामधील या घटकांना विशिष्ट रंगाचे ज्ञान असते. उदाहरणार्थ लाल रंग हा ठराविक कोन्स वा रॉडस ना असतो. प्रत्येक रंग दिसणे या क्रियेसाठी ते ते स्वतंत्र कोन वा रॉडस असतात. नेत्रतज्ज्ञांकडे याविषयीचे अधिक विस्ताराने ज्ञान न्याय मिळू शकेल. आपण आपल्या विषयापुरते बघूया !
एकूणच समोर दिसणार्या दृश्यातील वैविध्यपूर्ण रंग हे त्या-त्या कोन्स आणि रॉडसमुळे आपल्याला दिसतात. त्यामुळे ते दृष्य आपल्याला दिसते. ही झाली थोडक्यात ‘रंग’ दिसण्याची प्रक्रिया. आता आपण विविध रंगांच्या प्रकृतीबद्दल पाहू. प्रत्येक व्यक्तीला जशी प्रकृती असते तसेच प्रत्येक रंगाला देखील त्याची स्वतःची प्रकृती असते. रागीट किंवा शीघ्रकोपी प्रकृतीच्या व्यक्तीला उष्ण रंग किंवा पिवळा, नारिंगी, अधिक गडद रंग, काळा, लाल अशा वर्णनाचे रंग आवडतात वा पसंत असतात. अपवाद वगळता हे उदाहरण सर्वत्र दिसते असे निरीक्षण आहे. कफ-पित्त-वात, कफ-पित्त, पित्त-वात आणि वात-कफ अशा प्रकृतीच्या लोकांना विशिष्ट प्रकारचे रंगच अधिक पसंत असतात, आवडतात.
या प्रत्येक प्रकृतीच्या व्यक्तींनी जर त्यांच्या प्रकृतीनुसार रंगांचे कपडे, त्या रंगाच्या जवळ जाणाऱ्या रंगाच्या पदार्थाचे सेवन आणि शक्यतोवर त्याच रंगाचा प्रभाव असणाऱ्या वास्तुत (म्हणजे आतील भिंतींना दिलेला रंगही तसाच असावा) अधिक वेळ वास निवास तसेच अंतर्गत सजावटीच्या घटकांमधील, खिडक्यांचे पडदे वा पेंटिंग्स इत्यादी, नाईटलॅम्पचा / चे रंग वगैरे जर सुचवलेल्या रंग योजनांचा प्रभाव ठेवून उपयोग केला तर आवश्यक तो किंवा अपेक्षित असणारा परिणाम मिळवता येतो.
या प्रत्येक प्रकृतीचा आणि त्या प्रकृतीला आवश्यक किंवा योग्य परिणाम लाभेल अशा रंगयोजनांचा पण विस्ताराने विचार करणार आहोत. त्यात आपण रंगांचे कपडे, रंगांचा प्रभाव असणारे पदार्थ, रंगांच्या भांड्यातील (म्हणजे किंवा समतुल्य माध्यमातील भांडे), पाणी (यात ‘सूर्यजव’ नावाचा आणखी एक उपचार उपकारक ठरतो) इत्यादी बाबींचा विचार करणार आहोत.
या लेखात इथेच थांबू.
— गजानन सिताराम शेपाळ
Leave a Reply