नवीन लेखन...

रॅन्समवेअर व्हायरस

‘रॅन्समवेअर व्हायरस’ म्हणून ओळखला गेलेला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला झाल्यान शुक्रवारचा दिवस हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी काळा दिवस ठरला. ‘वन्नाक्राय’ या रॅन्समवेअर व्हायरसने अक्षरश: धुमाकूळ घातला. सायबर सिक्युरिटी फर्म ‘अव्हास्ट’ने सांगितले की, भारतासहशंभराहून अधिक देश या हल्ल्याचे शिकार झाले.

या हल्ल्याचा सर्वात जास्त फटका इंग्लडला बसला. इंग्लडमधील हॉस्पिटल्स आणि टेलिफोन यंत्रणा यामुळे खिळखिळी झाली. अनेक हॉस्पिटल्समध्ये तर रुग्णांचे आॅपेरेशन आणि अपॉइंटमेन्ट देखील रद्द करावे लागले तर अनेक ठिकाणी रुग्णांचा डेटा नसल्यामुळे डॉक्टरांवर कागद व पेन घेऊन रुग्णांचा चार्ट तयार करण्याची वेळ आली.

हा व्हायरस पसरू नये यासाठी रेनॉल्ट या फ्रेंच मोटार उत्पादक कंपनीस फरान्स व स्लोवेनियामधील कारखाने बंद ठेवावे लागले. अमेरिकेत ‘फेडएक्स’ या सामानाची वाहतूक करणाऱ्या बलाढ्य कंपनीलाही याच्या दुप्रभावापासून वाचण्यासाठी पावले उचलावी लागली. रशियात बँका आणि रेल्वे यंत्रणेच्या संगणक प्रणालीला या व्हायरसचा प्रादुर्भाव जाणवला. तसेच जर्मनीतही दॉएच्च बाह्न या रेल्वे प्रशासनाला याचा फटका बसला.

’रॅन्समवेअर’ म्हणजे काय ?

‘रॅन्समवेअर’मध्ये कुणीतरी सायबर गुन्हेगार अज्ञात ठिकाणाहून तुमचा संगणक किंवा लॅपटॉप हॅक करतो आणि तुमच्याकडे खंडणीची मागणी करतो.एखाद्या दिवशी तुम्ही तुमचा संगणक किंवा लॅपटॉप चालू करायला जाता आणि त्यावर एक मेसेज तुम्हाला दिसतो की तुमचा संगणक किंवा लॅपटॉप आम्ही हॅक केला असून तुमचा संपूर्ण डेटा तुम्हाला हवा असल्यास स्क्रीनवर दिसत असलेल्या ‘पेमेंट’ आॅप्शनला क्लिक करून अमुक इतकी रक्कम या बँक खात्यात पुढील अमुक इतक्या तासांत जर ही जमा झाली नाही तर तुमचा सर्व डेटा डिलिट होईल. तुमच्या स्क्रीनवर एका बाजूला तुम्हाला दिलेल्या वेळेचे काउंटडाऊन सुद्धा चालू झालेले असते.

अर्थात तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपचा संपूर्ण ताबा या हॅकर्सने घेतलेला असतो. या मेसेजच्या पुढे तुमचा संगणक किंवा लॅपटॉप जातच नाही. अर्थात, तुमची आॅपरेटिंग सिस्टम चालूच होत नाही. या प्रकारच्या सायबर गुन्हेगारीला ‘रॅन्समवेअर’ असे म्हणतात. असे प्रकार जगात अनेक ठिकाणी उघडकीस आलेले आहेत. जगाच्या कुठल्या तरी कानाकोपऱ्यात बसून तुमचा डेटा नष्ट करण्याचे उद्योग हे ‘सायबर भामटे’ करायला लागले.

काय काळजी घ्यावी ?

सगळ्यात आधी तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपमध्ये चांगला अ‍ॅण्टीव्हायरस असणे तसेच अ‍ॅण्टीव्हायरस नियमति अपडेट असणे आवश्यक आहे.

इंटरनेट वापरताना नेहमी सुरक्षित वेबसाईटलाच भेट द्या. कुठल्याही मोफत भूलथापाना बळी पडून चुकीच्या वेबसाईटला किंवा अनोळखी लिंकला क्लिक करू नका.

संगणक किंवा लॅपटॉपची आॅपरेटिंग सिस्टमही नेहमी अपडेट असावी; कारण अपडेटमध्ये बऱ्याच वेळा काही प्रॉब्लेम्सवर सोल्युशन उपलब्ध असते. जसे की ‘रॅन्समवेअर’साठी पॅच मायक्र ोसॉफ्टने दोन महिन्यापूर्वीच जारी केला होता .

तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपचा नियमति डेटा कॉपी करून दुसऱ्या हार्डडिस्कवर ठेवावा. म्हणजे तुमचा संगणक हॅक झाला आणि तुमच्या डेटाच्या बदल्यात हॅकरने तुमच्याकडे पैसे मागितले तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.

Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..