कवि होणें सुलभ असावे रसिक होण्यापरि
जिवंत ठेविती कवितेला हीच मंडळी खरी
भावनेचे उठतां वादळ व्यक्त होई शब्दानीं
भाव शब्दांचा हार दिसतो काव्य ते बनूनी
भाव येणे सहज गुण तो मानवी मनाचा
परि बंदिस्त त्याला करणे खेळ हा कवीचा
शब्द पिंजरा नि भाव पक्षी ओळखी को रसिक
कवि मनाशीं ‘स्व’ भावांचे करी जुळवणूक
कविते वरली टीका टिपणी मूल्यमापन त्याचे
खरी चेतना रसिक असूनी भाव जागवी मनाचे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply