भारतातील कुठल्याही शहरातील कुठल्याही ट्राफिक सिग्नल जवळ दिसणारे चित्र हा देश किती मागासलेला आहे याचे एक उदाहरण आहे. दोन लेनचा रस्ता असो वा तीन लेनचा, सिग्नल जवळ त्याच्या सहा-सहा लेन कशा होतात. अत्यंत सुशिक्षित वाटणारे लोक जेव्हा आपल्या गाड्या लेनची शिस्त मोडून पुढे घुसवण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी डोक्याला हात लावावासा वाटतो.
न्यूयॉर्क सारख्या शहरात ४ जुलैला लाखो गाड्या फटाक्याची आतषबाजी पाहायला रस्त्यावर येतात. पण कुणीही लेन कटिंग, आपली गाडी पुढे दामटवण्याचा प्रयत्न करीत नाही हे मी अनुभवले आहे. त्या गाड्यांमध्ये भारतीयांच्या गाड्या सुद्धा असतात.
ज्या देशात सार्वजनिक ठिकाणी लोकांनी कसे वागायचे ह्याचे प्रशिक्षण देण्याची खूप गरज आहे त्या देशात स्मार्ट सिटी प्रकल्प आणणे हे पैशाचा अपव्यय करणारे ठरेल.
RTO, पोलिस आणि महापालिकेचा कारभार प्रथम सक्षम करा. सार्वजनिक ठिकाणी गैर वागणा-या व्यक्तीस मग ती कितीही मोठी असो, तत्काळ शिक्षा होण्यासाठी कायदे कडक करा. सिटी आपोआप स्मार्ट दिसेल !
नव्या मुंबईमधील रेल्वे स्टेशनला काय अवकळा आली आहे ते जाऊन पहा. सुरवातीला जेव्हा हि स्टेशन बांधली तेव्हा उर आभिमानाने भरून आला होता. परंतु आता मात्र स्टेशन आणि त्याच्या आसपासचा परिसर पाहून दुखः होते.
काळाच्या कसोटीवर आगरकर खरे ठरले हेच याच वरून सिद्ध होते. ठाणे महानगरपालिकेचे रस्ते एकदा रात्री ३- ४ वाजता जाऊन पहा. इतक्या सुंदर शहरात राहतोय याचे अप्रूप वाटेल. पण मग दिवसा या रस्त्यांना अवकळा कोण आणतो? आपणच ना?
जो पर्यंत लोकां मध्ये स्वयंशिस्त येत नाही तो पर्यंत सिटी स्मार्ट होणे शक्य नाही.
— चिंतामणी कारखानीस
Leave a Reply