रात्र सामोरी येतां,
मन कसे कोमेजते,
मावळतां दिन सारा,
काळोख घेऊनी येते,
दिवसाचे तास संपती,
असे बघतां-बघतां,
स्मृतींच्या इंगळ्या डसती,
*संधिप्रकाश* ओसरतां,
काळजाचे धागे तुटतां,
जिवां हुरहूर लागे,—
फक्त “काहूर” तेवढे,
मनांत होते जागे,–!!
अंधाराची सोबत न्यारी,
कुणां अश्रू ना दिसे,
आपुल्याच,–रात्री वाटती,–
कसे ऋण” फेडायाचे,?
सुख–दु:खांचे,हिशोब सारे,
नकळत आपुले मन मांडते,
सरशी’ कुणाची होते हे,
सांगावयास न लागे,–!!
*झुंजूमुंजू*होतांना पण,
पक्षी किलबिलाट करती,
अनोखी त्यांची जिद्द पाहुनी,
जगण्याच्या ‘उर्मी’ उसळती,
आकाशी दिनकर उगवतां,
उर्जास्त्रोत’ कसा मिळे,
तेजस्वी'”” प्रकाशापुढे मन,
झुकून अगदी,वंदन’ करे,–
प्रकाश आणि अंधार हे,
सृष्टीचेच भाग असती,
अंधारातुनी *प्रकाशा*कडे,
ते कसा मार्ग दाखवती,–!!!
©️ हिमगौरी कर्वे.
Leave a Reply