‘स्वामी’, ‘त्रिकाल’, ‘शांती’ या मालिकेतील विविध भूमिकांसोबत अनेक चित्रपट आणि नाटकातील भूमिका गाजवणारे अभिनेता रविंद्र मंकणी व्यवसायाने सिव्हिल इंजिनीअर आहेत. त्यांचा जन्म २१ मे १९५६ रोजी झाला.
रविंद्र मंकणी यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच झाशीची राणी या ऐतिहासिक हिंदी मालिकेतही त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. ‘रवींद्र मंकणी’ यांची ‘स्वामी’ या मालिकेत ‘माधवराव पेशवे’ यांची भूमिका खूप गाजली होती. त्यांनी मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘रमा माधव’ या चित्रपटात ‘नानासाहेब पेशवे’ यांची भूमिका केली आहे.
रविंद्र मंकणी यांच्या २२ जून १८९७ व लिमिटेड माणुसकी या चित्रपटातील भूमिकेबद्दल पुरस्कार मिळाला होता. निवडुंग, स्मृतिचित्रे, वारस लक्ष्मीचा,बंद झरोके हे त्यांचे इतर चित्रपट.
आपला कलाकार या व्यवसायाबरोबरच रविंद्र मंकणी यांची पुण्यात रविराज पब्लीसीटी या नावाने प्रसिध्द अॅड एजन्सी आहे.
रविंद्र मंकणी हे जेष्ठ लेखक द.मा. मिराजदार यांचे जावई. रविंद्र मंकणी यांचा मुलगा सुश्रुत मंकणीसुद्धा चित्रपट सृष्टीत आहे. सुश्रुत याची संगीत अॅकेडमी पण आहे. गजेंद्र अहिरेंच्या ‘नातीगोती’ या सिनेमात तो पहिल्यांदा झळकला होता. ‘स्वराज्य’ या सिनेमात निगेटिव्ह भूमिका साकारुन त्याने अभिनयात वेगळी छाप उमटवली. ‘ना ना नकोसे’ आणि ‘गुलमोहोर’ या सिनेमांमध्येही तो झळकला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply