नवीन लेखन...

रविवार माझ्या आवडीचा

तुमचा आवडता वार कोणता? असा प्रश्न जर मला कोणी विचारला तर डोळे झाकून कोणताही विचार न करता मी रविवार असेेेच उत्तर देईन. मला सहसा कोणी प्रश्न विचारण्याच्यानगडीत पडत नाही. मी देखील विचार करून  नेहमीच उत्तर देतो असेही नाही. माझी बरीच उत्तरे मोघम असतात. त्यातील हे एक उत्तर.
आता मला रविवार का आवडतो त्या पाठीमागे ठोस असे एकच कारण नाही. रविवारी खूप वेळ झोपायला मिळते. झोप हा माझा तसा विक पॉईंन्ट. झोपेतून जागे करणाऱ्या माणसाचा मला खूप राग येतो. माझ्यात व बायकोच्यात मतभेद होण्याचे बहुदा हेच एकमेव कारण असते. तिला सूर्योदयाच्या आत उठण्याची सवय. मी कधीतरीच सूर्योदय पाहतो. तशी बायको खूप समंजस आहे. ती कधीच मला झोपेतून उठवण्याच्या भानगडीत पडत नाही.
कधी तरी पाहुणे येणार असले तर मात्र तिच्या अहो उठला का आठ वाजलेत. आत्ता पाहुणे येतील अशा हाका वर हाका सुरू असतात. पाहुण्यांना आमच्याकडे येण्यासाठी सकालचीच वेळ कशी सापडते हे मला आजवर न उल गडलेले एक कोडेचआहे. त्यात रविवार असला तर माझा रागाचा पारा आणखीच चढतो. एक दिवस सुट्टी असते तर ही पा हुुणे मंंडळी नेमकी याच दिवशी कडमडतात.
आता तुम्ही म्हणाल असे काय आहे रविवारच्या दिवशी. अहो आठवडाभर आलेला थकवा दूर करण्याचा हा दिवस. बाबा शाळेत सोडायला चला अशी मुलांची भुणभुण नसते. डबा तयार आहे .आवरा पटपट.ऑफिस ला जायचे नाही का अशी बायकोची बडबड नसते. शनिवारी मित्रांसोबत मस्त पार्टी करून रात्री एक दोन पेग जास्त झाले तरी चिंता नसते.
सकाळी पाहिजे तेंव्हा उठून तासभर क्रिकेट खेळून आंघोळ केली तरी चालते. बायको गरमागरम नाष्टा करते. रविवार असल्याने जेवणाचा बेत चांगला असतो. डब्यातील तीच तीच भाजी पानात नसते. दुपारी  सिनेमाचा बेत असतो. पाच वाजता मॉल मधील शॉपिंग असते. रात्री पुन्हा हॉटेलचा बेत असतो. दिवस कसा मस्त जातो.
फायलीच्या ढिगाऱ्यात बसून बॉसची कटकट ऐकावी लागत नाही . जाण्यायेण्यासाठी धावाधाव करावी लागत नाही. डब्यातील गार जेवण जेवावे लागत नाही . मग सांगा रविवार का नाही आवडणार.
हा काही वेळेस मात्र मला बायकोचा भलताच राग येतो. नेमके रविवारी ती घर आवरायला काढते. झाडलोट, फरशी पुुसणे, कपडेधुणे नेमके रविवारी निघते. हाताखाली मोफत गडी मिळतो ना. ती तर ही संधी कशी सोडणार. रविवारचा आणखी एक फायदा म्हणजे बायकोशी प्रेम करण्याची संधी मिळते. अर्थात बाईसाहेब मूडमध्ये असल्या तर. नाहीतर तिच्या पेक्षा ऑफिस मधील सहकारी परवडली असे म्हणण्याची वेळ येते.
रविवार हा प्रत्येक वेळी आनंदाचाच जाईल याची मात्र खात्री देता येत नाही. एखाद्या रविवारी आपण मस्तपैकी प्लॅनिंग करावे अन तिच्या माहेरचे कोणीतरी नेमके यावे यासारखे दुर्दैव दुसरे कोणतेही नाही. माहेरचे कोण आले की नवऱ्याला मी कसे मुठीत ठेवले आहे हे दाखवण्याची संधीच बायकांना लाभते. आपण अंथरुणात मस्त पैकी पडून रहावे तोच हिची आरोळी,  अहो झोपलात काय, जावा लवकर, श्रीखंडाच्या दोन पि शव्या घेेेऊन या. तुम्हाला कसलं मेल ते कौतुकच नाही. किती दिवसांनी माझे आई बाबा आलेत. बस झाली तुमची विश्रांती.
तर असा हा रविवार. दरवेळी माझ्या जगण्याला कलाटणी देणारा. तो मी कसा विसरीन. रविवारी खरच मी मनाचा राजा असतो. पण काही वेळेस नको तो रविवार असे वाटते.
एकदा असाच रविवारी निवांतपणे पडून होतो. टीव्हीवर मालिका पहात होतो. अंगात बनियन, बरमुडा असा पेहराव. तेवढ्यात बाईसाहेबांची मैत्रीण टपकली. दोघींंच्या गप्पा टप्पा हास्य विनोद झाले. जाता जाता तीने बायकोला काय कानमंत्र दिला कोणास ठाऊक. ती गेली अन बायको बोलू लागली.

Avatar
About प्रदिप गजानन जोशी 1 Article
वीस वर्षे पत्रकार. कथा, कविता, लेख, प्रवास वर्णन, समीक्षा. माजी पर्यवेक्षक, माजी पत्रकार, सध्या मुक्त पत्रकारिता. आत्मचरित्र लेखन सुरू.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..