नवीन लेखन...

अब्राहम लिंकनचे पत्र पुन्हा वाचताना

अनेक अव्यक्त भावना व्यक्त करण्याचं सामर्थ्य पत्रात असतं. पत्रानं व्यक्तिमत्व फुलतं, बहरतं. पत्र आठवणींचे पक्षी असतात. त्यातले काही मनात घर करतात. पत्र आनंद देतात, बेचैन करतात, अस्वस्थ करतात, विचार देतात, दिशा देतात. अब्राहम लिकनचं हेडमास्तरांस पत्र आठवणीचे पक्षीप्रमाणे आजही आदर्श म्हणून आमच्यासमोर आहे.

अध्यापक होणार्‍यांनी हे पत्र आत्मसात केलं तर शाळा संस्कार केंद्र होईल. पत्रातील विचार व आचार यातील दरी वाढतच आहे. अशावेळी पत्रच मित्र, तत्वज्ञ व मार्गदर्शक या सर्व भूमिका पार पाडू शकते. माणसाचा निवडुंग करायचा की गुलमोहोर करायचा हे कागदाचा चिठोराही कधी कधी ठरवतो.

संस्कारक्षम वयात पत्रही संस्कार करतात. पंडित जवाहरलालनी आपल्या कन्येला पत्रातून संस्कार, विचार दिले. मैलोगणपती दूर असलेली माणसे पत्रानेच जवळीकता अनुभवतात. काही पत्र आयुष्यभर कुरवाळायची असतात, जोपासायची असतात, त्यांच्या अदृश्य पाऊलखुणावर चालण्यातच जीवनाची यशस्विता असते. पत्राचे विचार मनात बंदिस्त करायचे असतात भितीवरल्या चौकटीतच नव्हे किमान अध्ययन क्षमता किवा किमान कौशल्यावर आधारित फक्त ते पत्र नव्हतं, यशस्वी जीवन जगण्यासाठी संस्कार करणारं हे पत्र आहे. शैक्षणिक संस्था, कुटुंब, समाज यांनाही ते दीपस्तंभ ठरु शकेल. पॅटर्न संस्कृतीत मुलांना घडवत असताना या पत्राकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. या पत्राचे बदलते संदर्भ लक्षात घेऊन किवा परिस्थिती बदलते संदर्भ लक्षात घेऊन या पत्राचा नव्याने विचार करणं आवश्यक ठरणार आहे.

मोठी माणसे पत्ररुपाने आपल्यात मृत्यूनंतरही असतात. अब्राहम लिकन आज असते तर आपले पत्र शैक्षणिक संस्था विसरल्या की काय? अशी शंका त्यांना आली असती. पत्राला ‘शोपीस केलेलं त्यांनाही आवडलं नसतं. काही पत्र काळाशी इमान ठेवून लिहिलेली असतात. काळ बदलतो, काळ सोकावतो,
परिस्थितीचे संदर्भ बदलल्यावरही पत्रातील विचारांची उंची कमी होत नाही. समाज थिटा पडतो. तेव्हा विचारांची उंचीच कामाला येते.

सगळ्याच माणसांचं ‘न्यायप्रिय, ‘सत्यनिष्ठ नसणं हे मुलांनी जाणलंय. शिक्षक, पालक यामध्ये सुध्दा हे शब्द त्याला दिसत असतील का? आदर्शाचे गोठून पुतळे फक्त शिलॢक आहेत. वरील शब्दांसाठी इतिहासाची पानेच चाळावी लागतील. विद्यार्थ्यांसमोर संस्कारापेक्षा परीक्षेचा पेपर बिबवला जातो.

शैक्षणिक संस्थांनी निकाल हेच अंतिम मानून मूल्यांचा निकाल लावला आहे. शाळेत शासन कमी व प्रशासन जास्त झालं आहे. शाळेला परिपत्रक बंधन वाटतं पत्र नव्हे. मुख्याध्यापकांचा परिसस्पर्श सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. सत्यनिष्ठा व न्यायप्रिय हे शब्द शब्दकोशातच गुरफटलेत, वास्तवलेत ते दुर्मिळ झाले आहेत. प्रत्येक बदमाशागणिक एक बदमाश वाढत आहे. दाऊद, हर्षदसारखा स्वार्थी राजकारण्यांचा पगडा समाजजीवनावर जबरदस्त आहे. शाळेच्या चार भितीबाहेरच मुलं सर्व पाहात आहेत, शिकत आहेत. शाळेत विषयाचं वेळापत्रक बनवता येतं पण आशयाच काय? शाळेत आशयाला न्याय न दिल्यामुळे शिकवणी, पाहून लिहिणं, टक्केवारीसाठी न समजता पाठांतर याचं प्रमाण वाढलं असावं का?

विजयाचा आनंद संयमानं न घेता उन्मत्तपणे आजचा विद्यार्थी घेतो. तो कोचिग क्लास, पॅटर्नला श्रेय शाळेपेक्षा जास्त देतो. तो कोचिग क्लासच्या जाहिरातीचं साधन बनतो. यशाची त्याला खात्री होती म्हणतो, कारण परीक्षकाची क्षमता तपासणार्‍यांचा प्रामाणिकपणा त्याला माहीत आहे. त्यांच्या पालकांची व शिक्षकांची धडपडही जास्त आहे. कारण त्याचं यश त्यांचं यश ठरणारं असतं.

शिस्त, मूल्यसंवर्धन या गोष्टी अभ्यासक्रमाचा भाग नसल्यामुळे शाळेपासून दूर गेल्या आहेत. हर्ष संयमानं व्यक्त करायला मुळात आज हर्षाचे प्रसंगच कमी होत चाललेत. आजच्या मुलांसमोर हर्षद आहे, हर्ष नाही. चार ओसाडी भितीत त्याला हर्ष सापडत नाही. वर्गपाठ, गृहपाठ, दप्तराचं ओझं, घर ते शाळा अंतर यात गुरफटलेली मुलं, पास होण्यापुरताच हर्ष त्यांच्या वाटेला येतो. स्वनिर्मितीचा आनंद नाही. रुक्ष अभ्यासक्रमात पोपटपंची आहे. पॅटर्नमुळे पोपटाच्या संख्येत भर पडत आहे. निसर्गातले हिरवे हिरवेगार गालिचे प्रदूषणाने काळवंडलेत. या देशाचा ताज काळवंडलाय विद्यार्थीसुध्दा शैक्षणिक प्रदूषणामुळे काळवंडले आहेत.

घाम गाळून कमावलेल्या छदामाचं महत्व विद्यार्थ्यांना शेअर घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर, बोप््तोर्स, भूखंड या पार्श्वभूमीवर पटवणं कठीण आहे.

हार स्वीकारायला आजची मुले तयार नाहीत. त्यांना यशाचा हार हवा आहे. त्यासाठी अशैक्षणिक गोष्टीसाठीही त्यांची तयारी असते, याबाबत मुख्याध्यापकही काही प्रमाणात हतबल ठरतात. कारण ताब्यात प्रचंड मेंढरं व निर्णय प्रकि्रयेतील शेवटचा दुवा म्हणूनच त्यांना भूमिका बजवावी लागते.

सामाजिक परिस्थिती विद्यार्थ्यांसमोर तणावपूर्ण आहे. अनेक स्फोटांच्या छायेत तो आहे. लोकसंख्या, ज्ञान, बाँब इ. स्फोट. आमच्या शिक्षणतज्ज्ञांना साखर कारखाना, मद्याकर् निर्मिती ना का मिळेना; पण शैक्षणिक संस्थांची परवानगी मिळाली तर राजकारण चुलीत जाईल म्हणून ते शक्य नाही. सहीवर महाविद्यालये, शाळा निघत आहेत, त्यामुळे एका रात्रीतून महाविद्यालये, शाळा वृत्तपत्रावरुन अवतरल्याचे समजते. गोदामातली महाविद्यालये काही दिवसांनी गोठ्यातही येतील. चार भिती व एक पाटी नावाची, एवढ्यावर संसार सुरु होतो. संस्कारासाठी प्रसिध्द असलेल्या शैक्षणिक संस्था टक्केवारीवरुन प्रसिध्द ठरत आहेत.

साखरसम्राटच शिक्षणसम्राट होत आहेत. गुरुंचा देश गुंडांचा होत चालला आहे. शैक्षणिक क्षेत्रांतील गुंडगिरी कागदावर खेळ खेळते, गुण वाढविणे, पेपर लिहिणे, प्रश्नपत्रिका फोडणे, कॉपी इ. ओल्या पार्टीने व पैशानेही अशैक्षणिक वावटळ थांबवली जाते. इतकी मुलं शतक झळकावून बाहेर पडत आहेत की परीक्षेची मर्यादा व क्षमता संपली का? एवढ्या शैक्षणिक प्रदूषणातही काहींची प्रतिभा आकाशाला भिडत आहे. There is shortcut to success हे कोचिग क्लास खरे ठरवत आहेत.

विचार व आचार याला वळण, आकार देण्यात शिक्षण असमर्थ, हतबल होत चाललं आहे. जमेल तेवढं ग्रंथभांडाराचं वैभव नव्हे तर दुर्देव विद्यार्थ्यांना पाहावं लागत आहे. शब्दांच्या वैभवातून त्याला निसर्गाचे वैभव समजून घ्यावे लागत आहे. दूरदर्शनच्या गर्तेत मुलं येत आहेत. शरीर व मन खिळवून ठेवणारं यंत्र व्यक्तिमत्वात पोकळी निर्माण करत आहेत. वहिनीची जागा वाहिनीने घेतलीय. कविता शिकवली जाते, व्याकरणाने पोस्टमार्टम करुन, ती आस्वादली प्कचित जाते. घराभोवतालच्या चार झाडातच निसर्ग शोधावा लागतो मुलांना. ध्वनि प्रदूषणामुळे निसर्गातलं संगीत ऐकू येत नाही. आम्ल पावसात सृष्टी भिजत आहे.

जिकडे सरशी तिकडे मुलं धावत आहेत. खलनायक, अनाडी आमच्या मुलांसमोर आदर्श ठरत आहेत. समाजाचं मानसशास्त्राच बदललं आहे. पैसा व राजकारण यापुढे शिक्षणाची कवचकुंडले तग धरेनाशी झाली आहेत. विनाअनुदानवाल्यांनी सर्व संत, देव यांची नावे वापरुन उध्दार सुरु केला आहे.

नाव संत, पण शिक्षणाची खंत. केवळ सरस्वतीच नव्हे तर लक्ष्मीपुत्र शिक्षक येत आहेत. हजारो रुपये देऊन शिक्षण प्रकि्रया बिघडविण्यासाठी शिक्षक लादले जात आहेत. पैशाचं खत असून सुध्दा काही संस्था फुलत नाहीत, बहरत नाहीत. भौतिक सोयी व नैतिक बाबी गुंडाळून शैक्षणिक संस्था काँग्रेस गवताप्रमाणे विस्तारित आहेत.

आजची दुःख शैक्षणिक दलालांनी वाढविली आहेत. जशी देणगी तशी लुटण्याची सोय होणार आहे. फसव्या जाहिरातीचं मृगजळ तरुणांना हैराण करत आहे. जाहिरातीपेक्षा ‘आमच्या संस्थेत… यांना घ्यायचा करार झाला आहे असं लग्नपत्रिकेप्रमाणे न छापता बोलवायचं अनेकांना व आधीच ठरलेल्यांशी करार करायचा. शिक्षण क्षेत्र प्रवेशपासून ते मूल्यमापनापर्यंत प्रश्न निर्माण करत आहे. अनेक प्रश्नांना उत्तर असलेलं शिक्षण आज स्वतः एक प्रश्न म्हणून आपल्यासमोर आलं आहे. शिक्षण संस्थेतून बाहेर पडणार्‍यांना K.S.I. Trade Mark हवा (Knowledge, Skill, Intelligence) आधी संख्या, मग दर्जा यामुळे शैक्षणिक प्रदूषण वाढत आहे. शिक्षणाचा असमतोल, विनाश यामुळे होत आहे. शिक्षणावरील श्रध्दा उडत जाणारे प्रसंग घडत आहेत.

अब्राहम लिकनने आपल्या गोड छोकर्‍यासाठी तो जीवनात यशस्वी व्हावा म्हणून, आदर्श म्हटला जावा यासाठी पत्र लिहिलं. किमान कौशल्य, किमान अध्यापन क्षमता, पॅटर्न हे ध्येय त्यांच्यासमोर नव्हते, हे पत्र आजच्या पार्श्वभूमीवरही दीपस्तंभ आहे. शैक्षणिक पोकळी इतकी निर्माण झाली आहे की, पत्र, संवाद, आंतरक्रियेनेच ती भरुन येईल. सगळा शैक्षणिक डोलारा कोसळत असताना मुख्याध्यापकांकडून खूप अपेक्षा आहेत. अशैक्षणिक बाबी शिक्षणाच्या नकाशावरुन पुसल्या जात नाहीत हे दुर्देव आहे. शिक्षण क्षेत्रात शैक्षणिक भूकंपाने या अशैक्षणिक गोष्टी गाडून त्याच्यावर बुलडोझर फिरवून नवीन शैक्षणिक पुनर्वसन आवश्यक आहे.

सभोवताली निराशा असूनही काही यशोगाथा आहेत. या पत्राला न्याय देणारे मुख्याध्यापकही आहेत. केवळ गुणवत्तेपेक्षा यशस्वी जीवनाचा पाया मजबूत करणारं हे पत्र आहे. असंख्य मुले नाव घेतील असं करण्यासाठी पत्राला खुंटीला टांगून हौतात्म्य देऊन चालणार नाही.

— डॉ. अनिल कुलकर्णी
मोबा. नं. ९४०३८०५१५३
ई-मेल – anilkulkarni666@gmail.com
अे-१३, रोहन प्रार्थना, गांधी भवन,
कोथरुड, पुणे ४११०३८

डॉ. अनिल कुलकर्णी
About डॉ. अनिल कुलकर्णी 32 Articles
डॉ. अनिल कुलकर्णी हे पुणे येथे स्थायिक असून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..