आपल्या तोडीचंच किंवा थोडा वरचढ सेन्स ऑफ ह्यूमर असणारं फ्रेंड सर्कल असणं ह्यासारखं दुसरं भाग्य नाही आणि आपण मारलेला एखादा पंच समोरच्याला समजावून सांगायची वेळ येणे ह्यासारखं दुर्भाग्य नाही.
समोरासमोर नसतानासुद्धा गप्पा मारताना टाईप केलेल्या वाक्यांमधून हवा तो अर्थ पटकन पटकन समजून, त्याचा अजून तिरका अर्थ काढून बोललेलं वाक्य तिसरीकडे नेऊन ठेवणे ह्यातली मजा अवर्णनीय आहे. वयाच्या बंधनाला अमान्य करून वाह्यातपणा चालू ठेवला की, बुद्धी ताजीतवानी राहते आणि मेंदू अखंड क्रिएटिव्ह राहतो.
“अरे तुझं वय काय, बोलतोयस काय?” हा प्रश्न ज्याला पडतो ती माणसं अकाली वृद्ध होतात. येता जाता केलेला फालतूपणा हा आपले हॅप्पी हार्मोन्स अबाधित ठेवतात,
एखादी गोष्ट सिरियसली न घेता अतिशयोक्ती वगैरे करून त्याची पार वाट लावणं ज्याला जमतं तेच खरे मित्र!
एकमेकांच्या वरचढ कोटी करून विनोदाची हद्द गाठणे, हेच खरं जीवन! बाकी सब मोहमाया!!
Leave a Reply