१. तणाव असंयमन
व्यायाम करताना, खोकला येताना, कफ असेल तेव्हा, शिंकताना, जोरात हसताना, एखादी जड वस्तू उचलताना किंवा शरिरावर ताण येणारी कोणतीही हलचाल करताना जेव्हा थोडी लघवी होते, त्याला मुत्राशयाचे तणाव असंयमन म्हणतात. मध्यम वयीन स्त्रीयांमध्येसुद्धा ही व्याधी दिसून येते. बाळंतपण झाल्यावर किंवा मेनॉपॉझ सुरू झाल्यावर स्त्रीयांना ही अडचण येऊ शकते.
२. घाई होणे, आणि ताबा न रहाणे
लघवीसाठी जाताना त्या जागी पोहोचे पर्यन्तसुद्धा काहीजण स्वत:वर ताबा ठेउ शकत नाहीत इतकी त्यांना घाई होते. सुदृढ-निरोगी व्यक्तींमधे सहसा ही अडचण दिसत नाही, परंतु मधुमेह झालेल्या व्यक्ती, स्ट्रोक, अल्झायमर, पार्किन्सन्स ह्या व्याधींसहीत जगणा-या व्यक्तींमधे लघवीवरील ताबा न रहाण्याची अडचण ब-याचदा दिसून येते. ही काहीवेळा ब्लॅडर कॅन्सरची पूर्वसूचनाही असू शकते.
३. अतिप्रवाह असंयमन
मुत्रप्रवाहावर असंयमन होते, जेव्हा थोडी लघवी न होता खूपच जास्त होते. पुरुषांचे प्रोस्टेट जेव्हा वाढते तेव्हा त्यांना अनेकदा ह्या व्याधीला सामोरे जावे लागते. मधूमेह किंवा मणक्याची काही व्याधी ह्यामुळे सुद्धा अतिप्रवाह असंयमनाची अडचण वाढू शकते.
४. सामान्य असंयमन
वृद्ध व्यक्तींमधे मुत्राशयावरील सामान्य असंयमनाची अडचण अनेकदा येते. ही अडचण अशांवर येते, ज्यांचे मुत्राशयावरील संयमन सर्वसामान्य आहे परंतु त्यांना लघवी लागल्यावर इतर काही कारणांमुळे उठायला त्रास होतो, चालायला त्रास होतो, अर्थ्रायटीस, गुडघे दुखी, अशक्तपणा ह्या व्याधींमुळे ही अडचण येऊ शकते. फक्त त्याचे गांभीर्य कितपत आहे आणि ते त्या वृद्ध व्यक्तीने कशा त-हेने घेतले आहे, आणि त्यांची जीवनशैली कशी आहे ह्यावरही ते अवलंबून असते.
५. मुत्राशयावरील नियंत्रणाचे प्रशिक्षण
आपल्या मुत्राशयाची काहे व्याधी सुरू झाली असेल लघवीवरील नियंत्रण जात असेल तर डॉक्टर आपल्याला ते नियंत्रण कसे ठेवायची ह्याचे प्रशिक्षण देतात. ह्यासाठी खरं तर अनेक मार्ग आहेत, परंतु आपल्या मुत्राशयाची व्याधी नेमकी काय आहे ह्यावर सुद्धा ते प्रशिक्षण अवलंबून असते. आणि प्रशिक्षण आत्मसात केल्यास आपण योग्य असे नियंत्रण मुत्राशयावर ठेऊ शकतो.
६. पेल्विक स्नायूंचा व्यायाम
पेल्विक स्नायूंच्या व्यायामाला केगल व्यायाम असेही म्हणतात. हा व्यायाम आपले मुत्राशयाजवळचे काही स्नायू बळकट करण्यासाठी उपयोगी ठरतो. हा स्नायू बळकट झाल्याने वृद्ध व्यक्तींना लघवीवर संयम राखणे सोपे जाते. तसे पहाता हे व्यायाम खूप सोपे आहेत. त्यामुळे आपला ताणही हलका होतो.
Leave a Reply